शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाचे डीआरडीओने घेतले घेतले सॅम्पल; दोन पथके झाली दाखल

By नरेश डोंगरे | Updated: December 21, 2023 00:06 IST

- घटनास्थळाची पाहणी, अधिकाऱ्यांकडून आढावा, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात - पुणे आणि दिल्लीच्या लॅबमध्ये होणार स्फोटाच्या सॅम्पलची तपासणी

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बाजारगाव जवळच्या सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाची चाैकशी करण्यासाठी भारतीय संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या(डीआरडीओ) तज्ज्ञांची दोन स्वतंत्र पथके आज सकाळी नागपुरात पोहचली. पथकातील अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापन तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्फोटाच्या घटनेचा आढावा घेतला आणि येथील काही सॅम्पलही ताब्यात घेतले. सोलर इंडस्ट्रीजमधील स्फोटाची चाैकशी करण्यासाठी बुधवारी डीआरडीओची पथके नागपुरात येणार असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय !

सहा महिलांसह ९ गरिब कामगारांच्या देहाच्या चिंधड्या उडविणाऱ्या सोलर इंडस्ट्रीजमधील भीषण स्फोटामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. हा प्रचंड शक्तीशाली स्फोट नेमका कसा झाला, त्याची चाैकशी नागपूर ग्रामीण पोलीस आणि पेसो करीत आहेत. सोबतीला एटीएसचे पथकही आहे. दरम्यान, सोलर इंडस्ट्रीजमधून भारतीय संरक्षण दलाला उच्च क्षमतेचा दारूगोळा पुरविला जातो. त्यामुळे या स्फोटाच्या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन डीआरडीओची दिल्ली तसेच पुणे येथील दोन पथके बुधवारी सकाळी नागपुरात दाखल झाली. त्यांनी सोलर इंडस्ट्रीजमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.

कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटना घडल्यापासून आजपर्यंतच्या घटनाक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर घटनास्थळ परिसरातील सॅम्पल गोळा केले. या सॅम्पलची तपासणी डीआरडीओच्या लॅबमध्ये केली जाणार असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही सीसीटीव्ही फुेजचेही डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केले.

दरम्यान, सुरक्षेच्या संबंधाने कंपनीकडून काय उपाययोजना केल्या जातात, त्यासंबंधानेही यावेळी माहिती घेतली. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाकडून काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते.

-----रुटीन व्हिजिट !

या संबंधाने सविवस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडे लोकमतने संपर्क केला असता ही 'रुटीन व्हिजिट' असल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. डीआरडीओ पथकाची सुरक्षेच्या संबंधाने अशी नेहमीच व्हिजिट असते, असे सांगतानाच काही कागदपत्रे या पथकाने बघितल्याचेही ते म्हणाले.-----

शोधकाम संपले, चाैकशी सुरूस्फोटाच्या घटनेपासून आज सकाळपर्यंत येथे आम्ही शोधकाम केले. आज मलब्यात मिळालेल्या मृतदेहाचे सात पार्ट विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, येथून ताब्यात घेण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य साहित्याचे आम्ही विश्लेषण करीत असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लोकमतला सांगितले. आजपासून घटनास्थळावरच्या मलब्याचे शोधकाम थांबविण्यात आले आहे. चाैकशी मात्र सुरू आहे, असेही पोद्दार यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर