शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

गँगरेपमध्ये नाट्यमय घडामोड

By admin | Updated: December 24, 2014 00:39 IST

नाट्यमय घडामोडींमुळे सुरुवातीपासूनच पोलिसांना हादरा देणाऱ्या कळमन्यातील सामूहिक बलात्काराच्या (गँगरेप) घटनेत पुन्हा एक नाट्यमय घडामोड पुढे आली आहे. सामूहिक बलात्काराची शिकार

सहा जणांनी केला बलात्कार : एफआयआरमध्ये पाचचीच नोंदनागपूर : नाट्यमय घडामोडींमुळे सुरुवातीपासूनच पोलिसांना हादरा देणाऱ्या कळमन्यातील सामूहिक बलात्काराच्या (गँगरेप) घटनेत पुन्हा एक नाट्यमय घडामोड पुढे आली आहे. सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या तरुणीने तक्रारीत दिलेल्या आरोपींच्या संख्येपेक्षा या गुन्ह्यात एक आरोपी जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा पोलीस ‘कन्फ्यूूज’ झाले होते. सहावा आरोपी करावा की नको, अशी पोलिसांची संभ्रमावस्था होती. शेवटी बराच विचारविमर्श केल्यानंतर या प्रकरणात सहावा आरोपी रोशन ऊर्फ भाजी मधुकर इंगळे (सद्भावनानगर, नंदनवन) याला अटक करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला. १ डिसेंबरच्या रात्री पोलीस असल्याची बतावणी करून पाच आरोपींनी आपल्या मैत्रिणीचे अपहरण केल्याची माहिती पीडित तरुणीच्या मित्राने पोलिसांना दिली. त्यामुळे हादरलेल्या पोलिसांची शोधाशोध सुरू असताना रात्री ९.४५ वाजता पीडित तरुणीने घरी पोहोचल्याचे मित्राला फोनवरून सांगितले. पोलिसांनी तिचे घर गाठून चौकशी केली असता तिने ‘पाच जणांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले.’ त्यामुळे पोलिसांना दुसरा हादरा बसला. आरोपी कोण आहेत किंवा ही घटना कुठे घडली, ते तरुणीला सांगता येत नव्हते. ‘ते दोन दुचाकींवर होते’, एवढेच ती सांगत होती. त्यामुळे पोलिसांवरील दडपण जास्तच वाढले. तब्बल १५ दिवसानंतर पोलिसांना घटनास्थळ आणि आता २२ दिवसानंतर आरोपी सापडले. मात्र, पोलिसांना आता पुन्हा एक धक्का बसला आहे. तो म्हणजे, ‘बलात्कार करणारे पाच नव्हे तर सहा आरोपी होते. या गुन्ह्यात दोन नव्हे तर तीन दुचाकींचा वापर केला’, अशीही माहितीवजा कबुली देऊन आरोपींनी पोलिसांना धक्का दिला आहे. पीडितेची तक्रार, एफआयआरमध्ये पाच आरोपी आणि त्यांच्या दोन दुचाकी, अशी नोंद आहे. त्यामुळे आता सहावा आरोपी करावा की नको, पुढे या बाबीचा आरोपींना फायदा होणार का, कोर्टात या मुद्यावरून बचाव पक्षाचे वकील पोलिसांची गोची करणार काय, असे अनेक प्रश्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पडले. शेवटी जेवढे आरोपी आहेत, तेवढ्यांनाही अटक करा, असे निर्देश वरिष्ठांकडून मिळाल्यामुळे सहावा आरोपी रोशन ऊर्फ भाजी मधुकर इंगळे (सद्भावनानगर, नंदनवन) याला पोलिसांनी आज अटक केली. (प्रतिनिधी)डीएनएतून मिळेल पुरावाअत्याचाराचा जबर मानसिक धक्का बसल्यामुळे पीडित तरुणीला व्यवस्थित माहिती देता आली नाही. मात्र, तिची आणि आरोपीची डीएनए टेस्ट करून या प्रकरणातील वास्तव उघड करता येईल. कोर्टात गोची होणार नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत. सोमवार ते सोमवार१ डिसेंबरच्या रात्री घडली, तो दिवस सोमवार होता. ती प्रचंड हादरली होती. त्यामुळे तिला कुठे घटना घडली तेसुद्धा नीट सांगता येत नव्हते. तब्बल १५ दिवसानंतर (१५ डिसेंबर) पोलिसांना घटनास्थळ सापडले, तो दिवसही सोमवार होता. आता पोलिसांनी आरोपींना ज्या दिवशी अटक केली तो दिवसही सोमवारच आहे.