शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह हवेत : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:43 IST

मराठी नाटकांचे महत्त्व हे केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रात राहून कळत नाही. बाहेरील राज्यात गेल्यानंतर आपल्या नाटकांचे वैभव व सखोलता लक्षात येते. मराठी नाटकांना चांगले दिवस आणायचे असतील तर रसिकांना नाट्यगृहांपर्यंत आणले पाहिजे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १२०० आसनक्षमतेचे नाट्यगृह निर्माण झाले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. रेशीमबाग मैदान येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देनाटकांना राजाश्रयासोबतच लोकाश्रयदेखील हवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी नाटकांचे महत्त्व हे केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रात राहून कळत नाही. बाहेरील राज्यात गेल्यानंतर आपल्या नाटकांचे वैभव व सखोलता लक्षात येते. मराठी नाटकांना चांगले दिवस आणायचे असतील तर रसिकांना नाट्यगृहांपर्यंत आणले पाहिजे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १२०० आसनक्षमतेचे नाट्यगृह निर्माण झाले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. रेशीमबाग मैदान येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते स्वागताध्यक्ष म्हणून बोलत होते.नाट्य, साहित्य या माध्यमातून समाजनिर्मितीचा संदेश प्रसारित होत असतो. मराठी नाटक हा राज्याचा अभिमान आहे व नाटकांची वैभवशाली परंपरा आपल्याला लाभली आहे. नाटकातून मराठीचा मानदेखील वाढला आहे. मात्र नाटकांची परंपरा आणखी समृद्ध करायची असेल तर राजाश्रयासोबतच लोकाश्रयदेखील तितकाच आवश्यक आहे. मराठी नाटकांना स्वस्त दरात नाट्यगृहे उपलब्ध झाली पाहिजेत व जाहिरातीचे दरदेखील कमी ठेवले पाहिजे. असे झाले तर मराठी नाटक दहा पटींनी अधिक लोकप्रिय होईल व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील वाढेल. जर असे झाले तरच मराठी नाटकांना चांगले दिवस येतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी नितीन गडकरी यांनी कविवर्य सुरेश भट सभागृहाचे उदाहरण दिले. भट सभागृह आज नागपूरची सांस्कृतिक ओळख झाले आहे. नाट्यगृहे केवळ तयार करणेच पुरेसे ठरणार नाहीत, तर त्यांचा दर्जा टिकविणेदेखील तेवढेच आवश्यक आहे, असेदेखील ते म्हणाले.आता नाटके पाहणे होत नाहीनितीन गडकरी यांची कला, संगीत व नाटकांप्रति असलेली आवड सर्वश्रुत आहे. यावर गडकरींनी भाष्य केले. बालपणी नागपुरात धनवटे रंगमंदिरात पणशीकर, कोल्हटकर यांच्यासह अनेकांची नाटके पाहिली. अगदी काही वर्षअगोदरपर्यंत महाराष्ट्र, मुंबईत असताना मराठी नाटके पाहण्याचा योग यायचा. मात्र दिल्लीत गेल्यापासून नाटके पाहणे होत नाही. मात्र नाटकांबद्दल असलेले प्रेम कमी झालेले नाही, अशी भावना नितीन गडकरी यांनी बोलून दाखविली.मराठी रंगभूमीला विदर्भात स्थैर्य मिळाले : शिलेदारएक काळ होता जेव्हा मराठी रंगभूमीचा विस्तार करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्या आव्हानात्मक परिस्थितीत मराठी रंगभूमीला विदर्भ व मराठवाड्याच्या मातीत स्थैर्य मिळाले. नाटककारांच्या पाठीशी लोक उभे ठाकले. आज तरुण रंगकर्मी वाढत आहेत. अशा तरुणांना शाबासकी देणाऱ्या रसिकांची गरज आहे, असे मत कीर्र्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNatakनाटक