शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य परिषद : मध्यवर्तीसोबतच सर्व शाखांची निवडणूक होईल एकत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:55 IST

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून येत्या काळात मध्यवर्तीसोबतच परिषदेच्या सर्व शाखांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देनियामक मंडळाची बैठक पुढच्या महिन्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवरही वर्तमान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांचा प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून ‘एक देश, एक निवडणूक प्रक्रिया’ धोरण राबविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून येत्या काळात मध्यवर्तीसोबतच परिषदेच्या सर्व शाखांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे.नाट्य परिषदेच्या वर्तमान कार्यकारिणीचा कार्यकाळ गेल्याच महिन्यात संपला असून, ऑगस्टच्या उत्तरार्धात शाखेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात वर्तमान कार्यकारिणीची अखेरची बैठक पार पडली होती. या बैठकीत निवडणुकीचा आराखडा मध्यवर्तीकडे पाठविण्यात आला असून, १० ऑगस्टपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर शाखेप्रमाणेच, नाट्य परिषदेशी संलग्नित अन्य काही शाखांच्या निवडणुकाही याच वर्षात होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एका खासगी कार्यक्रमानिमित्त मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी बुधवारी नागपुरात होते. चर्चेत त्यांनी नाट्य परिषदेच्या सर्वच शाखांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येतील, असले सूचक वक्तव्य केले. पुढच्याच महिन्यात नियामक मंडळाची बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.२०२३ पासून होतील एकत्र निवडणुकानाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक २०१८मध्ये पार पडली. मोहन जोशी गटाला धोबीपछाड देत, प्रसाद कांबळी गटाने बाजी मारत नियामक मंडळावर कार्यकारिणी बसवली. या कार्यकारिणीचा कार्यकाळ २०२३ मध्ये पूर्ण होत आहे. त्याअनुषंगाने, एकत्र निवडणुका घेण्याचा निर्णय २०२३ पासूनच अमलात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या वर्षात किंवा पुढच्या वर्षी होणाऱ्या काही शाखांच्या निवडणुकीत विजय मिळविणाºया कार्यकारिणीला २०२३ पर्यंतचाच काळ मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.

टॅग्स :NatakनाटकElectionनिवडणूक