शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नागपुरात डीसीपींच्या सहीचा बनावट परवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:43 IST

वाहतुकीला प्रतिबंध असताना दोन आरोपींनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या बनावट हस्ताक्षराचा परवाना तयार करून त्याआधारे टिप्परची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात आरोपी संतोष जयराम जिपके (वय ४३, रा. नागार्जुन कॉलनी नारी) आणि दीपक श्रीकांत गणवीर (वय ३२) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

ठळक मुद्देजड वाहनांची वाहतूक : दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतुकीला प्रतिबंध असताना दोन आरोपींनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या बनावट हस्ताक्षराचा परवाना तयार करून त्याआधारे टिप्परची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर कळमना पोलीस ठाण्यात आरोपी संतोष जयराम जिपके (वय ४३, रा. नागार्जुन कॉलनी नारी) आणि दीपक श्रीकांत गणवीर (वय ३२) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.वाहतूक शाखेच्या इंदोरा चेंबर-५चे पीएसआय अनंत उईके सोमवारी ९ एप्रिलला सकाळी ९ वाजता कापसी पुलाजवळ कर्तव्य बजावत होते. संतोष हा टिप्पर क्रमांक एमएच ४०/ एके ००२५ घेऊन नागपुरात येताना दिसल्याने उईकेने त्याला थांबवले. सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत जड वाहनांना प्रवेश बंद असल्याचे त्यांनी सांगितले असता आरोपी संतोषने पीएसआय उईके यांना टिप्पर क्रमांक एमएच ४०/एके ००२५ चा परवाना दाखवला. त्यात २० मार्च ते १८ एप्रिलपर्यंतची मुभा होती आणि त्याखाली वाहतूक शाखेचे उपायुक्त म्हणून रवींद्र परदेशी यांची स्वाक्षरी होती.हा परवाना बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसरा टिप्पर क्रमांक एमएच ३६/०९०७ चा चालक दीपक गणवीर याच्याकडेही असाच बनावट परवाना असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कळमना ठाण्यात गुन्हा दाखल करून या दोघांना अटक करण्यात आली.

 

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसCrimeगुन्हा