शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

डॉ. आंबेडकर रुग्णालयाचा विकास कधी ?

By admin | Updated: December 21, 2015 03:09 IST

कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे.

नागपूर : कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राची श्रेणी वाढवून तिथे ५६८ खाटांचे रु ग्णालय उभे करण्यास राज्य सरकारने मंजुरी देऊन दोन वर्षांचा कालावधी होत आहे. ‘एम्स’सोबतच या रुग्णालयाचा विकास होईल अशी घोषणाही झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात १० वर्षे होऊनही हे रुग्णालय केवळ बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाची रुग्णसंख्या दरवर्षी कमी होऊन सध्या ती ४०० वर आली आहे. ३ मार्च २०१४ रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्था स्थापन करण्यावर निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर करण्यात आला. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार होता. ५६८ खाटांचे हे रुग्णालय होणार होते. रु ग्णालयाकडे सध्या २९ हजार ७९ चौरस मीटरची जागा उपलब्ध आहे. यातील काही जागेवर बांधकाम होणार होते. डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची अशी १०७३ पदे भरण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यात प्राध्यापकांची २१, सहयोगी प्राध्यापकांची २३, सहायक प्राध्यापकांची ३६, वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११, परिसेविकांची ५०, अधिपरिचारिकांची ३४३ तर वर्ग ३ व ४ ची पदेही भरली जाणार होती. परंतु गेल्या दीड वर्षात यावर काहीच झालेच नाही. उलट रुग्णालयात मोजकेच उपचार तेही ठाराविक वेळेसाठीच होत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. (प्रतिनिधी)डॉक्टर, तंत्रज्ञ रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावितरुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र क्ष-किरण, पॅथालॉजी व सोनोग्राफी विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. तोकड्या मनुष्यबळामुळे यातील एक जरी रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावित होते. औषध व सोयींचा तुटवडामेयोच्या देखरेखेखाली हे रुग्णालय सुरू असले तरी डॉक्टरांची चमू ही आरोग्य विभागाची आहे. मेयोत आधीच औषधांचा तुटवडा असल्याने या रुग्णालयासाठी औषधे उपलब्ध करून देणे प्रशासनाला अडचणीचे जात आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयात ईसीजी मशीन नाही. पॅथालॉजीमध्ये मोजक्याच चाचण्या होतात. क्ष-किरण विभागात एक्स-रेचा तुटवडा राहत असल्याने रुग्णांना मेयोत पाठविले जात असल्याने या रुग्णालयाला घेऊन नागरिकांमध्ये रोष आहे. जिल्हा रुग्णालय झाल्यास या सर्व अडचणी सुटण्याची शक्यता आहे.