शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत घोळ , हजारो नावे डबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:13 IST

लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदाता यादीत अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना निवेदन सोपविण्यात आले. निवेदनात नागपूर लोकसभा क्षेत्रात ३४ हजार नावे आणि रामटेक क्षेत्रात ३१ हजार मतदातांची नावे एकापेक्षा अधिक वेळा नोंदविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नागपुरात ३४ हजार व रामटेकमध्ये ३१ हजार नाव दोनदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदाता यादीत अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना निवेदन सोपविण्यात आले. निवेदनात नागपूर लोकसभा क्षेत्रात ३४ हजार नावे आणि रामटेक क्षेत्रात ३१ हजार मतदातांची नावे एकापेक्षा अधिक वेळा नोंदविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्त्वात शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीने संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मतदान यादीतील त्रुटींबाबत माहिती दिली. विकास ठाकरे म्हणाले की, मतदाता यादीत एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नोंदविले जाणे गंभीर बाब आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदाता यादीत राज्यात एकूण ८ कोटी ४४ लाख मतदाता आहेत. यामध्ये ४४ लाख मतदात्यांचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नोंदविण्यात आले असल्याचा आरोप केला. शहरातील विधानसभेच्या सहा जागांवर अशाप्रकारच्या मतदात्यांची संख्या ३४ हजारांपेक्षा अधिक असल्याचेही ते म्हणाले. याचप्रमाणे मुळक यांनी सांगितले की, काँग्रेसने बुथनिहाय अभ्यास केला असता, रामटेक लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रात ३१,२४५ लोकांची नावे एकापेक्षा अधिक वेळा नोंदविण्यात आली आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून, या त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी केली. मतदार यादीतील घोळ दूर केला नाही तर याचा मतदान व निकालावरही परिणाम होऊ शकतो, असा धोका काँग्रेसतर्फे वर्तविण्यात आला. श्ष्टिमंडळात माजी आ. एस.क्यू.जामा, अ‍ॅड.अभिजीत वंजारी, तक्षशिला वाघधरे, सुरेश भोयर, मुजिब पठाण, कुंदा राऊत, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, संदिप सहारे, रमन ठवकर, राजेश कुंभलकर, अ‍ॅड.अक्षय समर्थ, युगल विदावत, प्रविण गवरे, विवेक निकोसे, गौरव चव्हाण, विश्वनाथ देशमुख, अशोक यावले, सुजाता कोंबाडे, नाना कंबाले, अमित पाठक, रिंकु जैन, राजेश पायतोडे, जगदीश गमे, सुभाष मानमोडे, प्रशांत ठाकरे, धरम पाटील, भारती कामडी, सुनिता जिचकार, रजत देशमुख, वसीम शेख,मुजाहीद खान, शांताराम मडावी, ईरशाद अली, देवा उसरे, पवन प्रजापती अदींचा समावेश होता.

 

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस