शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘डबल म्युटेशन’; कोरोनाबाधित मृत्यूसंख्येचा उच्चांक; २४ तासात ४७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 09:24 IST

Coronavirus death toll Nagpur news ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये ‘डबल म्युटेशन’ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही.

३,५७९ रुग्णांची भर : रुग्ण बरे होण्याचा दर १४ टक्क्याने घसरला

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये ‘डबल म्युटेशन’ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. परंतु म्युटेशनमुळे रुग्ण व मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसात ते दिसूनही येत असल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी ४७ रुग्णांचे जीव गेले. या वर्षातील ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. यात ३,५७९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,०७,०६७ झाली असून, मृतांची संख्या ४,७८४ वर पोहचली आहे.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांसोबतच ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाबाधितांच्या विषाणूची जनुकीय संरचनेचा शोध घेण्यासाठी म्हणजे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करण्यासाठी दिल्ली व पुण्याच्या प्रयोगशाळेत मेयोच्या प्रयोगशाळेने २०० नमुने पाठविले होते. परंतु याचा अहवाल प्रसिद्ध न करता महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे ‘डबल म्युटेशन’ झाले एवढेच सांगितले जात आहे. यामुळे कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनेला अजूनही फारसे गंभीरतेने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी १६,०६४ चाचण्या झाल्या. यात १२,५५३ आरटीपीसीआर तर ३,५११ अँटिजेन चाचणीचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ३,४७० तर अँटिजेनमधून १०९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णवाढीचा दर हा १.७२ टक्के असून, मृत्यूचा दर २.३१ टक्के आहे. गुरुवारी चाचण्यांच्या तुलनेत २२.२७ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले.

- शहरात २,५९७, ग्रामीणमध्ये ९७८ रुग्णांची नोंद

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील २,५९७, ग्रामीणमधील ९७८ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३३, ग्रामीणमधील १० तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील बाधितांची संख्या १,६४,२४९ झाली असून, मृतांची संख्या ३,०६५ झाली. ग्रामीणमध्येही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत ४१,८०३ रुग्ण व ८८६ रुग्णांचे जीव गेले.

-कोरोनावर मात करणाऱ्यांच्या दरात १४ टक्क्याने घट

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर हा ९४ टक्के होता. आता यात १४ टक्क्याने घट होऊन ८०.८७ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी २,२८५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,६७,४६४ झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येने धाकधूकही वाढविली आहे. ३४,८१९ रुग्ण नागपूर जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह असून, यातील ८,०५९ रुग्ण विविध रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. २६,७६० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

कोरोनाची स्थिती

दैनिक चाचण्या : १६,०६४

एकूण बाधित रुग्ण :२,०७,०६७

सक्रिय रुग्ण : ३४,८१९

बरे झालेले रुग्ण :१,६७,४६४

एकूण मृत्यू : ४,७८४

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस