शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोलर रुफ टॉपला मिळाले डबल क्रेडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:16 IST

महावितरणच्या सेंट्रलाईज्ड बिलिंग यंत्रणेत सातत्याने त्रुटी उघडकीस येत आहेत. सेक्युरिटी डिपॉझिटचे व्याज दोन वेळा घेतल्यानंतर आता सोलर रुफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना सलग दोन महिने क्रेडिट देण्यात आले आहे. बिल पाहून ग्राहक आनंदात आहेत. परंतु पुढच्याच बिलमध्ये त्यांना झटका लागणार आहे. कारण अतिरिक्त क्रेडिट परत घेण्यात येईल.

ठळक मुद्देग्राहक आनंदात, पण पुढच्या महिन्यात लागेल झटका : महावितरणच्या बिलिंग यंत्रणेची आणखी एक त्रुटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या सेंट्रलाईज्ड बिलिंग यंत्रणेत सातत्याने त्रुटी उघडकीस येत आहेत. सेक्युरिटी डिपॉझिटचे व्याज दोन वेळा घेतल्यानंतर आता सोलर रुफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांना सलग दोन महिने क्रेडिट देण्यात आले आहे. बिल पाहून ग्राहक आनंदात आहेत. परंतु पुढच्याच बिलमध्ये त्यांना झटका लागणार आहे. कारण अतिरिक्त क्रेडिट परत घेण्यात येईल.सरकारने अपारंपरिक ऊर्जा स्रोताला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर रुफ टॉपची संकल्पना सुरू केली आहे. भरभक्कम वीज बिल पाहून अनेक ग्राहकांनी आपापल्या प्रतिष्ठांनामध्ये सोलर रुफ टॉप लावले आहेत. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या क्षेत्रात असे १४५० ग्राहक आहेत. या ग्राहकांचे मीटर अत्याधुनिक आहेत. मीटर रीडर दर महिन्यात इम्पोर्ट (महावितरणकडून घेण्यात आलेली वीज), एक्सपोर्ट (महावितरणच्या ग्रीडमध्ये देण्यात आलेली सौर ऊर्जेद्वारा निर्माण केलेली वीज) आणि जनरेशन (रुफ टॉपमधून तयार होणारी वीज) चे युनिट नोंदवतात. वित्तीय वर्ष समाप्त झाल्यानंतर जर एक्सपोर्ट अधिक असेल तर ग्राहकांना अतिरिक्त निधी क्रेडिट केला जातो. अशा परिस्थितीत ग्राहकांचे वीज बिल शून्य किंवा मायनस येते. आतापर्यंत महावितरणच्या बिलिंग यंत्रणेद्वारा येथेच चूक झाली. एप्रिलमध्ये त्यांनी अतिरिक्त युनिट क्रेडिट केले होते. परंतु काही ग्राहकांच्या बिलामध्ये हे क्रेडिट होऊ शकले नाही. तक्रार केल्यावर झालेली चूक सुधारण्यात आली. परंतु मे मध्ये मिळणाऱ्या बिलामध्ये पुन: क्रेडिट देण्यात आले.एसएनडीएलने नोंदवली तक्रारवीज वितरण फ्रेन्चाईजीने ग्राहकांच्या खात्यामध्ये डबल क्रेडिट झाल्याची तक्रार महावितरणडे केली आहे. कंपनीने अशा ग्राहकांचे बिल महावितरणला देऊन समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महावितरणने पुन्हा एकदा आपली चूक मान्य करीत पुढच्या बिलमध्ये सर्व काही व्यवस्थित होईल, असे स्पष्ट केले आहे.सेंट्रलाईज्ड बिलिंग प्रणालीची तिसरी चूकसेंट्रलाईज्ड बिलिंग प्रणालीत ही तिसऱ्यांदा मोठी चूक झाली आहे. सर्वात अगोदर एसएनडीएलच्या परिसरातील ग्राहकांचे मीटर फोटो ऑनलाईन गायब करण्यात आले. यानंतर २० टक्के वीज ग्राहकांना सेक्युरिटी डिपॉजिटचे व्याज दोन वेळा देण्यात आले. आता सोलर ग्राहकांना सुद्धा डबल क्रेडिट देण्यात आले. महावितरणने अलीकडेच सेेंट्रलाईज्ड बिलिंग प्रणाली सुरु केली आहे. याअंतर्गत सर्व वीज बिल मुंबई येथील मुख्यालयात तयार होत आहेत. स्थानिक कार्यालय त्याला केवळ डाऊनलोड आणि प्रिंट काढून ग्राहकांना वितरित करीत आहेत.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज