शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

हजार नागपूरकरांना कोव्हॅक्सिनचा डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:18 IST

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जात असताना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचा तिसरा टप्पा नागपुरात सुरू झाला आहे. ...

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जात असताना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचा तिसरा टप्पा नागपुरात सुरू झाला आहे. यासाठी हजार स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया सुरू असताना यातील २५० स्वयंसेवकांना ही लस देण्यातही आली आहे. विशेष म्हणजे, यात पाच टक्के डॉक्टरांचा समावेश आहे. शिवाय, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड व यकृताचा आजार असलेल्या परंतु मागील तीन महिन्यांपासून तो नियंत्रणात असलेल्या रुग्णांनाही ही लस दिली जात आहे.

भारत बायोटेकच्या ‘कोेव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीला राज्यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ५५ तर दुसऱ्या टप्प्यात ५० स्वयंसेवकांना ही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याने आता तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. भारतात २४ हॉस्पिटलमधून २५,५०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. या टप्प्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयांना वगळण्यात आले आहे. राज्यात मुंबईच्या सायन हॉस्पिटल व नागपुरातील सीए रोडवरील रहाटे हॉस्पिटलकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘कोव्हॅक्सिन’ नागपूरचे रिसर्च हेड डॉ. आशिष ताजणे यांनी सांगितले, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात नोंद होऊनही ज्यांना ही लस मिळाली नाही अशा बहुसंख्य स्वयंसेवकांनी तिसऱ्या टप्प्यातील लसीसाठी पुढाकार घेतला आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. ही लस १८ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना दिली जात आहे. ६६ वर्षांवरील व्यक्तींना त्यांची व्हिडिओद्वारे परवानगी घेऊन समावेश केला जात आहे. ही लस मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्णांनाही दिली जात आहे. परंतु मागील तीन महिन्यांपासून या आजारावर नियंत्रण असले पाहिजे. या शिवाय, हृदयविकार, मूत्रपिंड व यकृताचा आजार असलेल्यांनाही तपासणीनंतर ही लस देता येते. परंतु या रुग्णांचीही प्रकृती गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर असण्याची अट आहे.

-दुसरा डोज ३० दिवसानंतर

डॉ. ताजणे म्हणाले, पहिला डोज आता दिल्यानंतर त्या दिवसापासून ३० दिवसानंतर स्वयंसेवकांना दुसरा डोज दिला जाईल. लस देण्यापूर्वी आरटीपीसीआर व ॲन्टिबॉडी चाचणी केली जाते. या सामान्य असल्यावरच लस दिली जात आहे. पहिल्या डोजनंतर ४२व्या दिवशी पुन्हा रक्ताची तपासणी करून अ‍ॅन्टिबॉडीज तपासले जातील. त्यानंतर निष्कर्षावर पोहचले जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सर्वच स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम असल्यानेच तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. तिसऱ्या टप्प्याच्या निष्कर्षानंतर ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे.