शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अन्य डॉक्टरांसोबत काम करू नका!, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना ‘एमएमसी’चे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:54 IST

MMC appeals to allopathy doctors : केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांच्यात वाद निर्माण झाला आहे.

नागपूर : अ‍ॅलोपॅथी (मॉडर्न मेडिसीन) शाखेतील डॉक्टरांनी इतर पॅथीच्या डॉक्टरांसोबत सेवा देऊ नये. इतर पॅथीसोबत काम करणे हे नीतिमत्तेला धरून नाही, असे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) परिपत्रकातून स्पष्ट केले आहे. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या डॉक्टरांसोबत काम न करण्याचे आवाहनही ‘एमएमसी’ने केले आहे.केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याने आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने करून एक दिवसाच्या संपाचे हत्यारही उपसले. तर ‘नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’च्या (निमा) सदस्यांनी त्या दिवशी गुलाबी रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. परंतु हा वाद आता इतक्यावर थांबताना दिसून येत नाही. ‘एमएमसी’च्या पत्रामुळे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अ‍ॅक्ट १९६५ची आठवण देताना इतर पॅथीसोबत काम करणे अन्य डॉक्टरांना प्राप्त कायदेशीर अधिकारावर घाला घालणारे आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाशी संलग्न नसणाऱ्या डॉक्टरांना मॉडर्न मेडिसीनची प्रॅक्टिस करता येणार नाही. यासोबतच अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना इतर पॅथीसोबत काम करू नये, असेही ‘एमएमसी’ने इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन-२००२चा दाखला देत स्पष्ट केले आहे.

पत्रच नीतिमत्तेला धरून नाहीमहाराष्ट्राची किंवा देशाची आरोग्याची स्थिती पाहता इतर पॅथीसोबतच अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी सेवा देऊ नये, असे म्हणणे अयोग्य आहे. शासनाच्या अनेक रुग्णालयात एमबीबीएस, बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टर सोबत रुग्णसेवा देतात. यामुळे एमएमसीने काढलेले परिपत्रकच नीतिमत्तेला धरून नाही. ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’ने  (एमसीआयएम) वैद्यकीय शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्री यांना नुकतेच एक पत्र देऊन  ‘एमएमसी’च्या भूमिकेचा विरोध केला आहे.    - डॉ. मोहन येंडे,     राज्य संघटक, निमा, महाराष्ट्र

टॅग्स :doctorडॉक्टर