शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरात ‘लॉकडाऊन’ नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 21:47 IST

‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यास शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. एकाच वेळी सारख्या विषयावर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच सूर दिसून आला. शहरात ‘लॉकडाऊन’ न लावता ‘स्मार्ट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यास शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. एकाच वेळी सारख्या विषयावर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच सूर दिसून आला. शहरात ‘लॉकडाऊन’ न लावता ‘स्मार्ट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. तर प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ लावल्यास जनतेसह रस्त्यावर उतरू, असा इशाराच महापौर संदीप जोशी यांनी दुसऱ्या बैठकीत दिला. एकूणच आता ‘लॉकडाऊन’च्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.‘लॉकडाऊन’संदर्भात मनपाच्या सभागृहात दुपारी १२ वाजता पूर्वनियोजित बैठक होती व यात पुढील रूपरेषेवर चर्चा होणार होती. नेमकी याच वेळी पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार,पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर व डॉ. दीपक सेलोकर यावेळी उपस्थित होते.शहरी व ग्रामीण भागात वाढलेली मृत्यूसंख्या कमी करण्यावर भर देण्यात यावा. ‘लॉकडाऊन’ हा पर्याय नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. साथीच्या काळात स्वच्छतेसाठी खासगी एजन्सीमार्फ त मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. उद्योग व्यवसाय नुकतेच रुळावर आले असून आता अर्थ चक्राला गती देण्याची वेळ आहे. ‘लॉकडाऊन’ हा पर्याय नसून प्रशासन मृत्यूसंख्या कमी करणे व जनजागृती या विषयी काम करणार आहे. मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, हा आग्रह कायम राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.लोकप्रतिनिधी आक्रमकलोकप्रतिनिधींच्या बैठकीत ‘लॉकडाऊन’चा विरोधच करण्यात आला. ‘स्मार्ट लॉकडाऊन’चीदेखील आवश्यकता नसल्याचा बैठकीत सूर होता. पुढील बैठक ७ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला खा. विकास महात्मे, शहरातील भाजपचे सर्व आमदार, मनपा पदाधिकारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रत्येक रुग्णाची ‘अ‍ॅण्टिजेन टेस्ट’वैद्यकीय उपचारासाठी मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ‘अ‍ॅण्टिजेन टेस्ट’ करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.पालकमंत्र्यांवर महापौरांचे टीकास्त्रमनपाची शुक्रवारी दुपारी बैठक होणार आहे यासंदर्भात पालकमंत्र्यांना माहिती होती. त्याच वेळी पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्याची गरज नव्हती. आम्हाला पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही बैठक थोडी उशिरा घेतली असती. एकाच वेळी दोन बैठका झाल्यामुळे जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. ‘कोरोना’च्या या काळात असे राजकारण करणे योग्य नाही, या शब्दांत महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली.लोकप्रतिनिधींच्या बैठकीला मुंढे गैरहजरमनपातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे पोहोचलेच नाहीत. ते पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी याबाबत काहीही कळविले नाही. जर त्यांनी सांगितले असते तर बैठकीची वेळ बदलता आली असती. मात्र त्यांनी मनपाच्या बैठकीला पाठ दाखविणे योग्य नाही, असे म्हणत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.सम-विषमचा नियम नकोजेथे १२ मीटरहून अधिक रुंदीचा रस्ता आहे तेथे सम-विषमचा नियम न लावता दोन्ही बाजूंची दुकाने उघडायला परवानगी दिली पाहिजे. शहरात दुकानदारांकडून अवैध पद्धतीने दंड वसुलण्यात येत आहे. याची स्थायी समितीकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. मनपा प्रशासन व काही हॉटेल संचालकांचे साटेलोटे आहे. १४ दिवस ‘क्वॉरंटाईन’ ठेवून बिल वाढविण्यात येत असल्याचा आरोप महापौरांनी लावला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याguardian ministerपालक मंत्रीNitin Rautनितीन राऊत