शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा अहंकार बाळगू नका, भाजपचे कॉंग्रेसीकरण करू नका; फडणवीसांकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2023 22:36 IST

Nagpur News आगामी मनपा निवडणूकांच्या तयारीत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच कानउघाडणी केली.

ठळक मुद्देनागपूर मनपात १२० जागांचे ‘टार्गेट’

नागपूर : आगामी मनपा निवडणूकांच्या तयारीत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच  कानउघाडणी केली. केंद्र व राज्यात सत्ता असल्याने काही पदाधिकाऱ्यांमध्ये अहंकार निर्माण झाला आहे. मात्र सत्तेचा अहंकार बाळगला तर जनता खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपमध्ये कॉंग्रेसीकरण होऊ देऊ नका,असे परखड बोल फडणवीस यांनी सुनावले. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे काही भाजप नेत्यांची वर्तणूक आहे. मात्र पक्ष आहे म्हणून सत्ता असते. पक्षाचा कार्यकर्ता हा जमिनीवर काम करणारा असावा. जनतेचे पदाधिकाऱ्यांकडे बारीक लक्ष असते. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून नेत्यांनीदेखील कार्यकर्ते म्हणून जनतेची काम करायला हवी व त्यांना मान द्यायला हवा. पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्याने तळागाळात जाऊन काम करायला हवे, असे फडणवीस म्हणाले. सध्या पोटनिवडणुका आणि सोबतच राज्याचा अर्थसंकल्पाचे काम असल्यामुळे नागपूरला जास्त वेळ देऊ शकणार नाही. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर नागपुरात जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेल, असे फडणवीस म्हणाले.

मनपाच्या निवडणूकीत भाजपने १२० जागांचे तर विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात १५० जागांवर विजय मिळविण्याचे उद्दीष्ट्य निश्चित केले आहे. त्यादृष्टीने नियोजन करून जनतेला जोडण्यावर भर देण्याची त्यांनी सूचना केली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, आ.कृष्णा खोपडे, आ.मोहन मते यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा