शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

'ड्रेसच दिला नाही अन् म्हणे स्वच्छ ड्रेस घालून या'! एसटी महाव्यवस्थापकांचे विभाग नियंत्रकांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 20:21 IST

Nagpur News गेल्या चार वर्षापासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेषच (ड्रेस) देण्यात आलेला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील एसटी महामंडळाच्या चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

नरेश डोंगरेनागपूर : एसटी बसमध्ये कर्तव्यावर रुजू होताना जे चालक, वाहक स्वच्छ गणवेष घालून येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, गेल्या चार वर्षापासून एसटीच्या चालक, वाहकांना गणवेषच (ड्रेस) देण्यात आलेला नाही. असे असताना आता अचानक आदेश काढून कारवाईची तंबी देण्यात आल्याने राज्यातील एसटी महामंडळाच्या चालक, वाहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात एसटी महामंडळात एकूण ६० हजारांवर चालक वाहक (ड्रायव्हर, कण्डक्टर) सेवारत आहेत. अलिकडच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना वर्षातून दोन गणवेष दिले जायचे. धुलाई भत्ताही मिळायचा. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना एसटीच्या चालक वाहकांना गणवेष देण्यात आला. त्यावर ठिकठिकाणी रेडिअम, डिझाईन असल्याने हा गणवेष टीका वजा चर्चेचा विषय ठरला होता. महिला चालक वाहकांचा गणवेष शाळकरी मुलींसारखा दिसत असल्याचीही ओरड झाली होती. दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून मात्र हजारो चालक-वाहकांना गणवेषच मिळाला नाही. त्यामुळे बहुतांश चालक वाहक आपले नेहमीचे कपडे घालून कर्तव्यावर येतात. काही जण नेम प्लेट, बॅज (बिल्ला) अन् लायसेन्सही जवळ बाळगत नसल्याचे ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर, एसटीचे (वाहतूक) महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील ३० विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून 'जे चालक, वाहक स्वच्छ गणवेष घालून येणार नाही, त्यांच्यावर कारवाई करा', असे आदेश दिले आहेत. या कारवाईची स्वतंत्र नोंद करून ती महाव्यवस्थापक कार्यालयाला कळवा, असेही या आदेश वजा पत्रात नमूद आहे. 

नंतरच आदेश लागू करा : कर्मचारी, संघटनाशिस्तीचा भाग म्हणून चालक वाहकांनीच नव्हे तर प्रत्येक कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेला शासकीय गणवेष घालायलाच हवा. मात्र, गणवेषच दिला नसताना तो घालून येण्याची सक्ती तसेच कारवाईचीही तंबी कशी दिली जाऊ शकते, असे प्रश्न चालक, वाहकांकडून उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नवीन गणवेष द्या, त्यानंतरच हा आदेश लागू करा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी केली आहे.

लवकरच नवीन गणवेष : महाव्यवस्थापक जगताप

नवीन गणवेष देण्यासंबंधाने महामंडळाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महिनाभरातच एसटीच्या चालक, वाहकांना नवीन गणवेष मिळणार आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी आहेच. मात्र, शिस्त आणि चांगुलपणाही महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी यासंबंधाने 'लोकमत'शी बोलताना दिली.

टॅग्स :state transportएसटी