शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका : शिक्षक संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:52 IST

कमी पटसंख्येच्या नावावर शाळांचे समायोजन करून, शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी पटसंख्येच्या नावावर शाळांचे समायोजन करून, शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.यातील बहुतेक शाळा या दुर्गम भागातील असून तेथील विद्यार्थ्यांकरिता जवळपासच्या परिसरात शिक्षणाची दुसरी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. बालकांच्या शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला १ किमी अंतराच्या आत प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला इयत्ता १ ते ५ वीपर्यंतचे शिक्षण १ किमी अंतराच्या आत पर्यायाने गावातच उपलब्ध होणे अनिवार्य आहे. शाळा बंद झाल्या तर येथील विद्यार्थ्यांना परिसरात शिक्षणाची सुविधाच उपलब्ध होणार नाही. हा निर्णय बालकांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणारा असून, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस अनिल नासरे यांच्यासह दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, सुरेश श्रीखंडे, हेमंत तितरमारे, मीनल देवरणकर, नीळकंठ लोहकरे, प्रकाश सव्वालाखे, सुरेंद्र कोल्हे, पुष्पा पानसरे, कल्पना इंगळे, नंदकिशोर वंजारी आदींनी केली आहे. यासंदर्भात जि.प.चे सीईओ योगेश कुंभेजकर यांना निवेदनही दिले आहे.सीईओंना दिले निवेदनअखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांनीसुद्धा यासंदर्भात सीईओंना निवेदन पाठविले. संघटनेच्या मते, कमी पटसंख्येच्या शाळा बहुतांश दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत. अनेक गावात जायला बारमाही रस्ते नाही, वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शाळेत बहुतांश गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मुले शिक्षण घेतात. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.

टॅग्स :Schoolशाळा