शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

डॉन अरुण गवळीला संचित रजाही मंजूर, उच्च न्यायालयाचा निर्णय 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 15, 2022 15:57 IST

अटींसह सोडले जाणार

नागपूर : काही दिवसांपूर्वी मुलाच्या लग्नानिमित्त मिळालेल्या अभिवचन रजा (पॅरोल) उपभोगून आलेला मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता संचित रजा (फरलो) देखील मंजूर केल्या.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांनी गवळीला हा दिलासा दिला. गवळीला त्याच्या पात्रतेनुसार व आवश्यक अटींसह संचित रजा देण्यात याव्या आणि त्याला या निर्णयाची प्रत मिळाल्यापासून एक आठवड्यात सोडण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले. रजा मंजूर केल्यास गवळी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रभावित करू शकतो, या कारणावरून कारागृह विभागाचे उपनिरीक्षक (पूर्व) यांनी गवळीचा संचित रजेचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने ठोस पुरावे रेकॉर्डवर नसल्यामुळे संबंधित कारण काल्पनिक असल्याचे मत व्यक्त केले. गवळीला यापूर्वीही अनेकदा अभिवचन व संचित रजेवर सोडण्यात आले. दरम्यान, त्याने नियमांचे काटेकोर पालन केले. त्याने एकदाही अवैध कृती केली नाही, असे न्यायालयाने रजा मंजूर करताना स्पष्ट केले. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयArun Gawliअरुण गवळीHigh Courtउच्च न्यायालय