ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:09 AM2021-01-22T04:09:45+5:302021-01-22T04:09:45+5:30

दीपक नारे लाेकमत न्यूज नेटवर्क बडेगाव : ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच संपली असून, यात बडेगाव (ता. सावनेर) परिसरातील खुबाळा, ...

Dominance of existing Zilla Parishad members in Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे वर्चस्व

ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे वर्चस्व

Next

दीपक नारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

बडेगाव : ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच संपली असून, यात बडेगाव (ता. सावनेर) परिसरातील खुबाळा, टेंभूरडोह, सोनपूर व गडमी या ग्रामपंचायतींवर काॅंग्रेस समर्थित गटाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांनी जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांना साथ दिली असून, माजी सदस्यांना नाकारल्याचे दिसून आले आहे.

या निवडणुकीच्यावेळी बडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील खुबाळा, टेंभूरडोह, सोनपूर व गडमी या चार ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. विशेष म्हणले बडेगाव जिल्हा परिषद सर्कल काॅंग्रेसचा गड मानला जातो. अंतर्गत कलहामुळे विजय देशमुख यांनी काॅंग्रेसला रामराम ठाेकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांना सावनेर तालुकाध्यक्षपदही बहाल केले. त्यामुळे बडेगाव सर्कलमध्ये भाजपची ताकद वाढणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात हाेते.

सन २०२० मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधून काॅंग्रेसच्या छाया चंद्रशेखर बनसिंगे यांनी भाजपच्या क्रांती सुशील देशमुख यांचा दारुण पराभव केला. त्या विजय देशमुख यांच्या सून हाेत. या जिल्हा परिषद सर्कलमधील खुबाळा व बडेगाव हे दाेन्ही पंचायत समिती सर्कलमध्ये काॅंग्रेसच्या उमेवारांनी बाजी मारली हाेती. त्यापूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजय देशमुख यांनी चंद्रशेखर बनसिंगे यांना पराभूत केले हाेते. त्यातच या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत विजय देशमुख यांच्या नेतृत्वात भाजप समर्थित गटांनी चारही गावांमधील निवडणूक लढविली.

परिणामी, विजय देशमुख यांना या भागात त्यांचे प्रभुत्व सिद्ध करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली हाेती. मात्र, मतदारांनी त्यांना याहीवेळी नाकारले. चारही ग्रामपंचायतींवर स्पष्ट बहुमत मिळवून एकहाती सत्ता मिळविण्यात काॅंग्रेस समर्थित गटाला यश आल्याने या भागातील विजय देशमुख यांचे प्रभुत्व कमी हाेत असून, त्यांची मतदारांवरील पकड सैल हाेत असल्याचेही दिसून आले. या निवडणुकीत आपण विकास कामांना प्राधान्य दिल्याची प्रतिक्रिया या चारही गावांमधील मतदारांनी व्यक्त केली.

...

ग्रामपंचायतींमधील संख्याबळ

बडेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील ग्रामपंचायत निवडणुका काॅंग्रेसच्या छाया बनसिंगे आणि भाजपचे विजय देशमुख यांच्या नेतृत्वात लढविण्यात आल्या. यात मतदारांनी छाया बनसिंगे यांना साथ दिली तर विजय देशमुख यांना नाकारले. खुबाळा येथे माजी सरपंच यादव ठाकरे यांच्या नेतृत्वातील काॅंग्रस समर्थित गटाला नऊपैकी सहा जागा मिळाल्या तर टेंभूरडाेह येथे माजी उपसरपंच दीपक सहारे यांच्या नेतृत्वातील काॅंग्रेस समर्थित गटाला सात, गडमी येथे विद्यमान पंचायत समिती सदस्य गणेश काकडे यांच्या नेतृत्वातील काॅंग्रेस समर्थित गटाला सातपैकी चार जागा आणि साेनपूर येथे माजी सरपंच पांडुरंग कुंभरे यांच्या नेतृत्वातील काॅंग्रेस समर्थित गटाला सातपैकी पाच जागा मिळाल्या आहेत.

Web Title: Dominance of existing Zilla Parishad members in Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.