शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

ज्या बाईचे कुंकू मिटते ती प्रसिद्धीचा स्टंट करते का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या अनेक भागांत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत़ नागपुरात जय जवान जय किसान संघटनेने सोमवारी आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे़ ज्या बाईचे कुंकू मिटते ती काय प्रसिद्धीचा स्टंट करते का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना केला. आंदोलन सुरू असतानाच ...

ठळक मुद्देकेंद्रीय कृषिमंत्र्यांना सवाल : जय जवान जय किसान संघटनेने रस्त्यांवर दूध ओतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या अनेक भागांत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत़ नागपुरात जय जवान जय किसान संघटनेने सोमवारी आंदोलन करीत शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे़ ज्या बाईचे कुंकू मिटते ती काय प्रसिद्धीचा स्टंट करते का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना केला. आंदोलन सुरू असतानाच संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांचे हृदयविकाराने निधन झाले यामुळे आंदोलनावर शोककळा पसरली़केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविरोधी धोरणाच्या विरोधात शेतकºयांनी संपाचे हत्यार उगारले आहे़ संपाच्या समर्थनात नागपुरातील प्रजापतीनगर चौक येथे जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार व नगरसेवक दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात सोमवारी दुपारी आंदोलन करण्यात आले़ सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला़ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत दूध रस्त्यावर ओतत निदर्शनेही केली़या वेळी रस्त्यावर दूध ओतणाऱ्या आंदोलकांत आणि पोलिसांत बाचाबाची झाली. सरकारने शेतकºयांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढला नाही तर माजी खासदार व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहराचे दूध बंद करू, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला़ रवींद्र इटकेलवार, आकाश थेटे, राजू मोरे, बंडू घोडमारे, विलास पैठणकर, प्रशांत वांढरे, जितू नवघरे, हर्ष गोडे, अरविंद पारधी, नवीन वेदक, बंटी रहांगडाले, अमित जेठे, प्रशांत भोयर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.संघटनेचे शरद खेडीकर यांचा हृदयविकाराने मृत्यूआंदोलन सुरू असतानाच आंदोलनात सहभागी शरद खेडीकर (रा़ खरबी) यांची प्रकृती खालावली़ त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला़ उपचारासाठी त्यांना तत्काळ एकविरा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले़ मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली़ अर्जनवीस म्हणून काम करणाऱ्या खेडीकर यांना एक मुलगा व एक मुलगी आहे़ ते ४५ वर्षांचे होते़ त्यांच्या निधनामुळे संघटनेत शोककळा पसरली आहे़

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपnagpurनागपूर