शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मेडिट्रिनातील अपहराचे दस्तावेज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 23:33 IST

करोडो रुपयाच्या अपहार प्रकरणातील आरोपी असलेले रामदासपेठ येथील मेडिट्रिना हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. समीर पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांचे घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झडती घेऊन दस्तावेज जप्त केले. पोलिसांनी आयकर विभागाकडून रुग्णालयाशी संबंधित दस्तावेजाच्या प्रमाणित प्रतीही प्राप्त केल्या. पोलीस डॉ. पालतेवार त्यांची पत्नी सोनाली आणि इतर साथीदारांच्या या फसवणुकीतील भूमिकेचाही तपास करीत आहे.

ठळक मुद्देअकाऊंटंटला विचारपूस : आयकर विभागाशीही संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करोडो रुपयाच्या अपहार प्रकरणातील आरोपी असलेले रामदासपेठ येथील मेडिट्रिना हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. समीर पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांचे घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झडती घेऊन दस्तावेज जप्त केले. पोलिसांनी आयकर विभागाकडून रुग्णालयाशी संबंधित दस्तावेजाच्या प्रमाणित प्रतीही प्राप्त केल्या. पोलीस डॉ. पालतेवार त्यांची पत्नी सोनाली आणि इतर साथीदारांच्या या फसवणुकीतील भूमिकेचाही तपास करीत आहे.गुन्हे शाखेने मंगळवारी गणेश चक्करवार यांच्या तक्रारीवरून डॉ. पालतेवार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध चार कोटी रुपये अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत अपहार करणे, रुग्णांकडून वसुली करणे, त्यांच्या नावावर हॉस्पिटलचे पैसे खाणे, बोगस व्हाऊचरद्वारा हॉस्पिटलच्या खात्यातून पैसे काढणे आणि बोगस दस्तावेज बनवून फसवणूक करण्याचा आरोप आहे. चक्करवार यांनी जुलै २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेत तकार दाखल केली होती. परंतु आर्थिक शाखेने कुठलीही कारवाई न कल्याने चक्करवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पोलिसांना २३ जानेवरीपर्यंत कारवाई करण्याची मुदत दिली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी तपासानंतर गुन्हा दाखल केला.सूत्रानुसार पोलिसांनी रुग्णालय, डॉ. पालतेवार आणि या अपहराशी संबंधित इतर लोकांचे कार्यालय आणि घराची झडती घेऊन दस्तावेज जप्त केले. सप्टेंबर २०१७ मध्ये आयकर विभागाने रुग्णालयात धाड टाकून मोठ्या प्रमाणावर दस्तावेज जप्त केले होते. पोलिसांनी आयकर विभागकडून त्या दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतीही प्राप्त केल्या. पोलिसांनी डॉ. पालतेवार यांना विचारपूस केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, चक्करवार हेच आर्थिक विशेषज्ज्ञ आहेत. तेच रुग्णालयातील आर्थिक व्यवहाराची पाहणी करायचे. २०१७ मध्ये डॉ. पालतेवार आणि चक्करवार यांची रुग्णालयात ५०-५० टक्के हिस्सेदारी होती. नंतर चक्करवार यांनी आपली १७ टक्के हिस्सेदरी डॉ. पालतेवार यांना दिली होती. त्यामुळे डॉ. पालतेवार यांची रुग्णालयातील हिस्सेदारी ६७ टक्के झाली. ते सध्या रुग्णालयाचे सीएमडी आहेत.तपासात लागेल वेळपोलीस रुग्णालयातील आर्थिक व्यवहार आणि शासकीय योजनांमध्ये फसवणूक प्रकरणाचा तपास करीत आहेत. शासकीय योजनांमधील गैरप्रकाराचा पत्ता लावण्यासाठी आरोग्य विभागाकडून दस्तावेज प्राप्त करण्यात आले आहेत. रुग्णालयातील गैरप्रकाराचा पत्ता लावण्यासाठी संबंधित लोकांची विचारपूस केली जात आहे. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचायला वेळ लागणे निश्चित आहे. त्यामुळे सध्या तरी कुणालाही अटक झालेली नाही.पोलिसांचे वाढले कामफसवणुकीचा गुन्हा दाखल होताच अनेक रुग्ण तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आले आहेत. बहुतांश रुग्णांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडून उपचाराच्या नावावर भरमसाट पैसे घेण्यात आले. शासकीय योजनांचे लाभार्थी असूनही त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. याची तक्रार केल्यानंतरही आरोग्य विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. या तक्रारींमुळे पोलिसांचे काम वाढले आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलfraudधोकेबाजी