शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

पदवीधरमध्ये आज मतसंग्राम

By admin | Updated: June 20, 2014 01:08 IST

लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होणाऱ्या नागपूर विभागातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी २० जून रोजी मतदान होत आहे. सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ८७ हजारावर पदवीधर

१४ उमेदवार - ३१७ मतदान केंद्रेनागपूर: लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच होणाऱ्या नागपूर विभागातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी २० जून रोजी मतदान होत आहे. सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ८७ हजारावर पदवीधर मतदार त्यांचा प्रतिनिधी निवडण्यासाठी ३१७ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या दरम्यान मतदान करतील. मतदानासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि कामगार यांना मतदान करता यावे म्हणून चार तासाची सुटी देण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर व्हीडीओ कॅमेरे लावण्यात येणार आहे. २४ तारखेला नागपूर येथे प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये मतमोजणी होणार आहे.नागपूर विभागातील नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमिळून पदवीधर मतदारसंघ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे बबन तायवाडे, भाजप-सेना युतीचे प्रा. अनिल सोले, अपक्ष किशोर गजभिये आणि महेंद्र निंबार्ते या चार प्रमुख उमेदवारांसह एकूण १४ जण रिंगणात आहेत. एकूण २ लाख ८७ हजार ६२२ मतदार असून त्यांच्यासाठी विभागात ३१७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चार ते पाच अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण १५०० कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहे. मतदान पसंतीक्रमानुसार होणार असून मतदारांना नकारात्मक मतदानाचा(नोटा) पर्यायही देण्यात आला आहे. एकूण ३ लाख ५० हजार मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. त्याचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यासाठी २७०००, गोदिंया जिल्ह्यासाठी २२०००, वर्धा ३४०००, चंद्रपूर ४५०००, गडचिरोली १६००० आणि नागपूर जिल्ह्यासाठी २ लाख ४ हजार मतपत्रिका छापण्यात आल्या आहेत. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे २ हजार मतपत्रिका राखीव ठेवण्यात येणार आहे.सोले यांच्यासाठी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर तायवाडे यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सभा घेतल्या. अपक्ष किशोर गजभिये यांना बसपाने पाठिंबा जाहीर केला. प्रचार करताना उमेदवारांनी स्थानिक नेटवर्कवर भर दिला. हायटेक यंत्रणेचा वापर करण्यात आला.मतदार यादी संकेतस्थळावरलोकसभा आणि विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणेच प्रथमच पदवीधर मतदार संघातील मतदारांची यादीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदारांची यादी व मतदान केंद्राची माहिती उपलब्ध आहे.