शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिव्यांगांना चालणे शिकविणारी नागपुरातील डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 10:50 IST

पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट डॉ. मीनाक्षी वानखेडे त्या महिला डॉक्टरचे नाव. नागपूरच्या पहिल्या पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट म्हणून त्यांची ओळख आहे.

ठळक मुद्दे२२ वर्षांची सेवास्वावलंबन, पुनर्वसन, संशोधन आणि स्वतंत्र उद्यानासाठी संघर्ष

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सेरेब्रल पाल्सीसह काही आजारांमध्ये चिमुकल्यांचा शरीराचा काही भाग किंवा संपूर्ण शरीराच्या हालचालीमध्येच संतुलन नसते. अशा मुलांना नीट उभेही राहता येत नाही. त्यांना चालणे शिकविणारी एक महिला डॉक्टर गेल्या २२ वर्षांपासून आपली सेवा देत आहे. एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करता याव्यात, त्यांनी स्वावलंबी व्हावे, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे पुनर्वसन व्हावे, त्यांच्यासाठी वेगळी बाग असावी यासाठीही त्यांचा संघर्ष सुरू आहे.पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट डॉ. मीनाक्षी वानखेडे त्या महिला डॉक्टरचे नाव. नागपूरच्या पहिल्या पेडियाट्रिक फिजिओथेरपीस्ट म्हणून त्यांची ओळख आहे. लहान मुलांना फिजिओथेरपी देऊन त्यांना त्यांच्या स्वबळावर चालता यावे, या प्रयत्नाला त्यांनी सर्वप्रथम सुरुवात केली आणि यातच स्वत:ला वाहूनही घेतले. त्या सेरेब्रल पाल्सीच नाही तर डाऊन सिंड्रोम, कन्जेनायटल डिफॉर्मेटिव्ह, आॅर्थाेपेडिक डिसॅब्लिटीस्, मल्टीपल हॅण्डीकॅप, आॅटीझम, एडीएचडी, एलडी, हायपरअ‍ॅक्टिव्ह अशा विविध ‘चाईल्डहूड डिसआॅर्डर’ मुलांसाठी काम करतात. दिव्यांग मुलांना चालवणे हे त्यांच्या प्रशिक्षणाचे पहिले पाऊल असते. यामुळे दिव्यांग मुलाचे पहिले पडलेले पाऊल, पहिला शब्द, पहिला स्वत: घेतलेला घास याचा आनंद तो स्वत:च अनुभवावाच लागतो, असे त्या म्हणतात. त्यांना सर्वात मोठा आनंद झाला जेव्हा ‘हॅण्ड फ्री मोबॅलिटी वॉकर’ला शासनाकडून ‘पेटेंट’ मिळाले. ज्या मुलांना स्वत:च्या पायावर चालणे सोडा नीट उभेही राहता येत नव्हते त्यांच्यासाठी हे ‘वॉकर’ वरदान ठरले आहे. दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र बाग असावी. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तशी खेळणी असावी यासाठी २०१३ पासून त्या धडपड करीत आहेत. त्रिमूर्तीनगरच्या उद्यानाचा एक कोपरा दिव्यांगाच्या उद्यानासाठी मिळाला. परंतु अद्यापही खेळणी व इतर सोयी उभ्या करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आजही सुरू आहे.डॉ. वानखेडे सांगतात, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला मी त्याच्या क्षमतेप्रमाणे एक स्वप्न देते, त्याला परिश्रमाचे पंख लावते. माझ्या हाताची पकड मजबूत करून आकाशाकडे झेप टाकते, त्यांच्या स्वप्नांचे भान ठेवते. आपण कुठेही कमी पडणार नाही असा आत्मविश्वास मनाशी ठासून हा कणखर प्रवास सोपा करण्याचा प्रयत्न करते, कारण मला त्यांचा आनंद बघायचा असतो.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस