शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जनतेचे डॉक्टर काळाच्या पडद्याआड : डॉ.फझल तैयब यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:08 IST

शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक तसेच सामाजिक सेवेसाठी ओळखले जाणारे डॉ.फझल तैयब (९५) यांचे निधन झाले. नागपुरात मागील ५० वर्षांपासून ते आरोग्य सेवा देत होते.

ठळक मुद्दे७२ वर्षे केली रुग्णसेवा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक तसेच सामाजिक सेवेसाठी ओळखले जाणारे डॉ.फझल तैयब (९५) यांचे निधन झाले. नागपुरात मागील ५० वर्षांपासून ते आरोग्य सेवा देत होते. ‘आयएमए’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राहिलेल्या डॉ.फझल तैयब यांनी तब्बल ७२ वर्ष वैद्यकीय क्षेत्रात ‘प्रॅक्टिस’ केली. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गरीब रुग्णांपासून शुल्क न घेता ते मोफत औषधे द्यायचे. त्यामुळेच ‘जनतेचे डॉक्टर’ म्हणून त्यांची ओळख बनली होती.मेहदीबाग येथील निवासी डॉ.फझल तैयब हे मध्यप्रदेश येथे ‘सिव्हिल सर्जन’ होते. त्यानंतर ते नागपुरात आले व लकडगंज येथे रुग्णसेवा करत होते. त्यांनी २२ वर्ष ग्रामीण क्षेत्रांमध्ये सेवा प्रदान केली. ३२ किलोचा डिम्बग्रंथीचा ‘ट्यूमर’ त्यांनी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढला होता. अनेकदा गावात भूलतज्ज्ञ उपलब्ध नसतानादेखील ते यशस्वी शस्त्रक्रिया करत. कांजीहाऊस कब्रस्तानात त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे. त्यांचा नातू फैज फजल हा नामांकित क्रिकेट खेळाडू आहे.९० वर्षाच्या वयापर्यंत खेळले क्रिकेटडॉ.फझल तैयब यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ९० व्या वर्षाच्या वयापर्यंत ते क्रिकेट व गोल्फ खेळायचे. त्याचप्रमाणे ते आध्यात्मिकदेखील होते. रात्रभर जागून ते अरबी व उर्दूतील धार्मिक साहित्याचा अनुवाद करायचे. वय जास्त असले तरी त्यांनी अनेक मोठ्या यात्रा केल्या. ते शायरी, संगीत व साहित्यप्रेमीदेखील होते.

टॅग्स :Deathमृत्यूdoctorडॉक्टर