शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

होमिओपॅथीचा डॉक्टरच होता टॉसिलिझुमॅब रॅकेटचा सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 23:08 IST

mastermind of the Tosilizumab racket कोरोनाच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार होमिओपॅथीचा डॉक्टर होता.

ठळक मुद्देउमरेडच्या खासगी रुग्णालयात आहे तैनात : वर्षभरापासून करीत होता काळाबाजार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार होमिओपॅथीचा डॉक्टर होता. अंबाझरी पोलिसांनी उमरेडच्या खासगी रुग्णालयात तैनात असलेल्या फैजान खान (३०) या होमिओपॅथीच्या डॉक्टरलाअटक केली आहे. फैजान एक डझन रेमडेसिविर आणि चार टॉसिलिझुमॅबचा काळाबाजार केल्याची माहिती पुढे आली असल्यामुळे पोलीसही अवाक्‌ झाले आहेत.

झोन दोनच्या पथकाने एक लाख रुपयांत टॉसिलिझुमॅब इंजेक्शनची विक्री करताना बालाघाट येथील रहिवासी सचिन गेवरीकर (२०), विशेष ऊर्फ सोनू बाकट (२६) आणि रामफल वैश्य (२४) यांना अटक केली होती. पोलिसांना सचिनने एक लाख रुपयांत टॉसिलिझुमॅब इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती मिळाली होती. इंजेक्शनची मूळ किंमत ४० हजार ६०० रुपये होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सचिनला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून होमिओपॅथीचा डॉक्टर सोनू आणि रामफलला अटक करण्यात आली. त्यांनीच सचिनला टॉसिलिझुमॅब विक्रीसाठी दिले होते. पोलिसांना तपासात दोघांचा डॉ. फैजानसोबत संपर्क असल्याची माहिती मिळाली. चौकशी केल्यानंतर फैजानने टॉसिलिझुमॅब दिल्याची कबुली दिली. त्या आधारावर आज दुपारी डॉ. फैजानला अटक करण्यात आली. फैजान बालाघाटचा रहिवासी आहे. तो बालाघाटच्या होमिओपॅथी कॉलेजमध्ये सोनू आणि रामफलचा सिनिअर होता. कोरोना सुरू झाल्यानंतर त्याची उमरेडच्या एका खासगी रुग्णालयात नियुक्ती झाली. तो रुग्णालय परिसरातच राहत होता. डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे फैजानचा रुग्णालयात दबदबा निर्माण झाला होता. त्याचा फायदा घेऊन तो रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅबची चोरी करू लागला. फैजानने आतापर्यंत एक डझन रेमडेसिविर आणि चार टॉसिलिझुमॅबची चोरी केली आहे. त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता त्याचे संकेत मिळाले. सोनू, रामफल आण सचिन इंजेक्शनची विक्री करीत होते. त्यांना फैजान टॉसिलिझुमॅब ६० ते ७० हजारांत उपलब्ध करून देत होता. तिघेही गरजूंकडून एक लाख रुपये वसूल करीत होते. या रॅकेटमध्ये रुग्णालयातील इतरही सहभागी असल्याची शंका आहे. त्याची माहिती मिळविण्यासाठी अंबाझरी ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद म्हात्रे यांनी फैजानची १ जूनपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे. तर, इतर तिघे शुक्रवारपर्यंत अटकेत आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टरArrestअटक