शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

करू क्या डायल नंबर, पोलीस म्हणतात डायल-१००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 10:58 IST

आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला नागपूर पोलिसांनी दिलेल्या सणसणीत उत्तरामुळे रणवीर आज दिवसभर नेटकऱ्यांच्या उपहासाचा विषय ठरला.

ठळक मुद्देनागपूर पोलिसांच्या रिव्टिटमुळे बाजीराव ट्रोलअभिनेता रणवीर सिंगची दांडी गुल

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हॉट इज मोबाईल नंबर, व्हॉट इज यूअर स्माईल नंबर... व्हॉट इज यूअर स्टाईल नंबर, करु क्या डायल नंबर, असा प्रश्न करून रेट्रो लूकमध्ये स्वत:चा फोटो व्टीट करणाऱ्या आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला नागपूर पोलिसांनी दिलेल्या सणसणीत उत्तरामुळे रणवीर आज दिवसभर नेटकऱ्यांच्या उपहासाचा विषय ठरला. सोबतच या उत्तरामुळे नागपूर पोलीस पुन्हा देशविदेशातील नेटकऱ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले.बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिंबासारखे सुपरडुपर हिट चित्रपट देतानाच चित्रविचित्र स्टाईलच्या फोटोमुळे रणवीर सिंग सध्या तरुणाईची धडकन बनला आहे. रणवीर कधी स्वत:चे हॉट फोटो पोस्ट करतो तर कधी दीपिकाच्या फोटोवर कमेंट करत सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टीव्ह राहतो. त्यामुळे नेटकरी त्याच्यावर नजर रोखून असतात.वोगच्या फोटोशूटमधील लॅण्डलाईन फोनवर बोलतानाच्या पोजमधील फोटो रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे. ८० च्या दशकातील हिरोसारखा फिट्ट शर्ट आणि बेलबॉटम पॅन्ट घातलेल्या दिसणाऱ्या फोटोला रणवीरने गोविंदा-करिश्मा कपूरच्या गाण्याच कॅप्शन दिल आहे. गोविंदा-करिश्मावर चित्रित ‘‘व्हॉट इज मोबाईल नंबर, व्हॉट इज यूअर स्माईल नंबर... व्हॉट इज यूअर स्टाईल नंबर, करु क्या डायल नंबर’’,अस हे गाणं होत. या गाण्याने ९० च्या दशकात कमालीची लोकप्रियता मिळवली होती. ती ध्यानात ठेवून की काय, रणवीरने आपल्या फोटोखाली ‘‘व्हॉट इज मोबाईल नंबर... करु क्या डायल नंबर...’’ असा प्रश्न विचारला असावा. त्याच्या या प्रश्नवजा कॅप्शनला अर्थातच हजारपेक्षा जास्त मजेदार उत्तर ( कमेंट) दिले आहेत. नागपूर पोलिसांनी मात्र रणवीरचे व्टिट रिव्टिट करून त्याला डायल १०० असा पर्यायवजा उत्तर दिले आहे. अर्थात् नागपूर पोलिसांनी त्याला तू पोलिसांना १०० नंबरवर डायल कर, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, अस सुचवल आहे. देशविदेशातील ५ हजारांवर नेटकऱ्यांनी नागपूर पोलिसांचे हे रिव्टिट व्हायरल केल आहे. त्यामुळे रणवीरचे व्टिट आणि नागपूर पोलिसांचे हे रिव्टिट घेऊन नेटकरी रणवीरला दिवसभर ट्रोल करीत होते.नागपूर पोलिसांच्या व्टिटर अकाऊंटवरून हँडल करण्यात आलेले हे रिव्टिट कमालीचे लोकप्रिय ठरले आहे. त्याला बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६७५४ नेटकऱ्यांनी रिव्टिट केले होते तर, तब्बल २९,२०० लाईक मिळाले होते. नेटकऱ्यांच्या या प्रतिसादामुळे नागपूर पोलिसांचे व्टिटर अकाऊंट दुसऱ्यांदा जगभरातील नेटकऱ्यांत चर्चेला आले आहे. यापूर्वी चंद्रयान -२ मोहिमेतील विक्रम लँडरने आपली कार्यकक्षा सोडली अन् प्रतिसाद देणे बंद केले होते. त्यावेळी त्याने प्रतिसाद द्यावा म्हणून देशभरात वेगवेगळे प्रयोग झाले होते. नागपूर पोलिसांनी मात्र विक्रम लँडरला ‘ चिंता करू नको... कार्यकक्षा (सिग्नल) तोडले तर तोडले... तू प्रतिसाद दे... तुझे चालान फाडणार नाही!’ असे व्टिट करून जगभरातील नेटकऱ्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

टॅग्स :Policeपोलिस