-तर सोनिया गांधी खोटे बोलत आहेत का? सुधाकर देशमुखांचा पटोलेंवर पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 01:27 AM2019-03-17T01:27:27+5:302019-03-17T01:28:18+5:30

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचे संसदेत दिलखुलासपणे कौतुक केले. मात्र काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवारांनी गडकरी यांनी नागपुरात काय विकास कामे केली, असा प्रश्न करीत आहेत. अशास्थितीत मग सोनिया गांधी या खोटे बोलत आहेत का, असा सवाल करीत भाजपाचे शहर निवडणूक प्रमुख आ. सुधाकर कोहळे यांनी नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे.

-Do Sonia Gandhi are lying? Sudhakar Deshmukh's hammered Patole | -तर सोनिया गांधी खोटे बोलत आहेत का? सुधाकर देशमुखांचा पटोलेंवर पलटवार

-तर सोनिया गांधी खोटे बोलत आहेत का? सुधाकर देशमुखांचा पटोलेंवर पलटवार

Next
ठळक मुद्दे विकास कामांमुळे विरोधक बिथरले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचे संसदेत दिलखुलासपणे कौतुक केले. मात्र काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवारांनी गडकरी यांनी नागपुरात काय विकास कामे केली, असा प्रश्न करीत आहेत. अशास्थितीत मग सोनिया गांधी या खोटे बोलत आहेत का, असा सवाल करीत भाजपाचे शहर निवडणूक प्रमुख आ. सुधाकर कोहळे यांनी नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे.
नागपूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाच्या निवडणूक संचालन समितीची त्यांनी घोषणा केली. यावेळी नाना पटोले यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करणाऱ्यांनी स्वत:ची माहिती तपासून घ्यावी. केवळ सोनिया गांधीच नव्हे तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खारगे यांनीदेखील गडकरी यांनी केलेल्या विकास कामांचे कौतुक केले. विरोधकांनीदेखील बाक वाजवून गडकरी यांच्या कामाची पावतीच दिली. मात्र राहुल गांधी यांनी उमेदवारी दिलेल्या पटोले यांनी गडकरींनी काय केले, असे विचारून पक्षनेत्यांवरच अविश्वास दाखविला आहे. श्वेतपत्रिका कुणी काढावी, याचा विचार काँग्रेसच्याच नेत्यांनी करावा, असे देशमुख म्हणाले. मागील पाच वर्षांत नितीन गडकरी यांनी ‘न भूतो न भविष्यति’ विकास केला आहे. जातीपातीचे राजकारण न करता हीच कामे घेऊन जनतेत जाणार आहोत. विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नाहीत. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप ते करीत आहेत, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. पत्रकारपरिषदेला आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके उपस्थित होते.
पटोलेंना शहराची माहिती किती?
नाना पटोले हे नागपूरमधून निवडणूक लढत आहेत. मात्र त्यांना शहराची माहिती तरी किती आहे. त्यांनी मस्कासाथ, बंगालीपंजा, जाटतरोडी, टिमकी हे भाग कुठे आहेत हे तरी अगोदर सांगावे, असे म्हणत संदीप जोशी यांनी त्यांना चिमटा काढला.

Web Title: -Do Sonia Gandhi are lying? Sudhakar Deshmukh's hammered Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.