शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरीत्या पार्क केलेली वाहने जप्त करण्याचे अधिकार आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 20:44 IST

अवैधरीत्या पार्क केलेल्या वाहनांवर दंड आकारला जातो, पण अशी वाहने जप्त करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर ३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, असे अधिकार नसल्यास यासंदर्भात आवश्यक निर्देश जारी करण्याचे संकेत दिले.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : राज्य सरकारला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैधरीत्या पार्क केलेल्या वाहनांवर दंड आकारला जातो, पण अशी वाहने जप्त करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर ३ आॅक्टोबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, असे अधिकार नसल्यास यासंदर्भात आवश्यक निर्देश जारी करण्याचे संकेत दिले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. खासगी प्रवासी वाहने अवैधरीत्या दुकानापुढे उभी केली जात असल्यामुळे गणेशपेठ येथील तुषार पडगिलवार यांनी रिट याचिका दाखल केली आहे. गणेशपेठ परिसरात अनेकजन प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे वाहने पार्क करण्यासाठी स्वत:ची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे ते जागा मिळेल तेथे वाहने उभी ठेवतात. त्यामुळे दुकानदार व रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, वाहतूककोंडीही होते. उच्च न्यायालयाने गणेशपेठ परिसरातील खासगी प्रवासी वाहनांच्या बेशिस्तीची स्वत: दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली होती. वाहतूकदारांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:ला शिस्त लावण्याची ग्वाही दिली होती. परंतु, संबंधित प्रकरण निकाली निघताच वाहतूकदार मुजोर झाले असून पुन्हा बेशिस्तीने वागायला लागले आहेत. त्याचा फटका सहन करावा लागत असल्यामुळे पडगिलवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या प्रकरणात न्यायालयाने सरकारला वरीलप्रमाणे माहिती मागितली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर