शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आकाशाला गवसणी घालणारे संशोधन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 19:35 IST

संशोधन पॅशन आहे. ते २४ बाय ७ असते. संशोधन एक दिवसाचे, एका आठवड्याचे किंवा एका वर्षाचे कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीने पदवी शिक्षणापासून संशोधनाची कास धरावी. संशोधनाला बंदिस्त न ठेवता ते आकाशाला गवसणी घालणारे आणि अधिक समाजोपयोगी कसे होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे प्रा. पद्मविभूषण डॉ.एम.एम.शर्मा यांनी केले.

ठळक मुद्देएम.एम.शर्मा यांचे आवाहन : स्व. दादासाहेब काळमेघ महाविद्यालयात संशोधन दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : संशोधन पॅशन आहे. ते २४ बाय ७ असते. संशोधन एक दिवसाचे, एका आठवड्याचे किंवा एका वर्षाचे कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे नव्या पिढीने पदवी शिक्षणापासून संशोधनाची कास धरावी. संशोधनाला बंदिस्त न ठेवता ते आकाशाला गवसणी घालणारे आणि अधिक समाजोपयोगी कसे होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे प्रा. पद्मविभूषण डॉ.एम.एम.शर्मा यांनी केले.स्व.दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्यावतीने दादासाहेब काळमेघ यांच्या ८५ जयंती वर्षानमित्त संशोधन दिनाचे आयोजन शुक्रवारी वानाडोंगरी येथे करण्यात आले होते. यावेळी डॉ. शर्मा यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांशी संवाद साधला.नव्या पिढीतील संशोधनात्मक कृतीचे कौतुक करीत प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा सध्या त्यांच्या क्षेत्रात जे नवीन घडते आहे त्याची माहिती विद्यार्थ्यांनी द्यावी. पुस्तकी शिक्षणाने संशोधनात्मक पिढी कधीही घडणार नाही. याउलट प्राध्यापक अपडेट नाही असा ग्रह विद्यार्थी करतील, अशी कोपरखळी त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना मारली.संशोधनाच्या क्षेत्रात काळमेघ दंत महाविद्यालयाने टाकलेल्या पावलाचे कौतुक करीत या महाविद्यालयाने दंतचिकित्सा आणि संशोधन क्षेत्रात उत्कृ ष्ट कामगिरी बजवावी, असे आवाहनही यावेळी केले. दंतचिकित्सा क्षेत्रात सध्या आमूलाग्र बदल होत आहे. दातांची काळजी आता केवळ अप्पर क्लास घेत नाही तर सामान्य माणूसही आता याबाबत सजग झाला असल्याने या क्षेत्रात चांगल्या संशोधनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना चांगल्या आणि माफक दरात दंत आरोग्य सेवा कशी मिळेल, याकडे महाविद्यालय आणि संशोधकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.आयसीटी मुंबईचे कुलगुरु पद्मश्री डॉ. जी.डी.यादव, स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शरद काळमेघ, सचिव हेमंत काळमेघ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय पाटील, उद्योजक अरुण लखानी, संजय चौगुले,डॉ. सतीश लाडे, शशांक म्हस्के, संजय देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.संशोधनाच्या क्षेत्रात महाविद्यालयाने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. शरद काळमेघ यांनी याप्रसंगी दिली. यासोबतच संशोधनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया विद्यार्थी आणि शिक्षकाला वर्षाला प्रत्येकी १ लाख १ रुपयांचा पुरस्कार देण्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. संजय पाटील यांनी केले.मुली शिकतील तरच लोकसंख्येवर नियंत्रणकेंद्र सरकारने मुलींना पहिली ते पीएच.डी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची मागणी डॉ.जी.डी.यादव यांनी यावेळी केली. तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुनसिंग यांच्याकडे तसा प्रस्ताव ठेवला होता, असे सांगताना ते म्हणाले की, भारतात १० वी १२ बारावीपर्यंत मुलगी शिकली की तिचे वडील लग्न लावतात. मुलींना न शिकविण्यामागे आर्थिक परिस्थिती हेही कारण आपल्याकडे आहे. त्यामुळे सरकारने मुलींचे पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण मोफत केले तर मुली अधिक उच्चशिक्षित होतील. उच्च शिक्षण घेताना त्यांचे वयही वाढले. पर्यायाने लग्न उशिरा होईल आणि शिक्षित माता लोकसंख्या नियंत्रणाचे प्रभावी माध्यम ठरेल, असे मत यादव यावेळी मांडले. दादासाहेब काळमेघ यांच्या सामाजिक विचाराप्रमाणेच त्यांच्या नावाने चालणाऱ्या महाविद्यालयातील संशोधन समाजोपयोगी कसे होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन महाविद्यालयातील संशोधक आणि प्राध्यापकांना यावेळी केले.

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थी