शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सला क्षुल्लक समजू नका : संजय देशपांडे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 20:59 IST

मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्यासाठी चांगले लैंगिक आयुष्यही महत्त्वाचे ठरते. यामुळे डॉक्टरांनी हा प्रश्न विचारून त्यांचे समुपदेशन करावे. ‘सेक्स’ला क्षुल्लक समजू नका, असे आवाहन प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. संजय देशपांडे यांनी येथे केले.

ठळक मुद्दे‘व्हॅपीकॉन’ वैद्यकीय चिकित्सकांच्या परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लैंगिक आयुष्य अनुभवणे हे निरोगी, निकोप जीवनाचे लक्षण आहे. परंतु जसजसे आपण वयाने प्रौढ होतो तसतसे लैंगिक सुख घेण्याची गरज उरत नाही, असा एक गैरसमज, जो समाजात रूढ आहे. विशेषत: वयाच्या ४५ नंतर मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण जेव्हा फिजिशियनकडे येतात तेव्हा आरोग्याला घेऊन अनेक प्रश्न विचारले जातात. परंतु लैंगिक आयुष्याबाबत विचारले जात नाहीत. मधुमेह व उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्यासाठी चांगले लैंगिक आयुष्यही महत्त्वाचे ठरते. यामुळे डॉक्टरांनी हा प्रश्न विचारून त्यांचे समुपदेशन करावे. ‘सेक्स’ला क्षुल्लक समजू नका, असे आवाहन प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. संजय देशपांडे यांनी येथे केले.असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, विदर्भ शाखेच्या १२व्या वार्षिक परिषदेचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. मंगेश तिवस्कर, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, मेळघाटात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. आशिष सातव यांच्यासह परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. प्रभाकर देशपांडे, आयोजन सचिव डॉ. विनोद खंडाईत, ‘एपीआय’चे सचिव डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. सुहास कानफाडे आदी उपस्थित होते. संचालन डॉ. अमोल मेश्राम व डॉ. आसावरी देशपांडे यांनी केले तर आभार डॉ. खंडाईत यांनी मानले.लैंगिक आयुष्याचे शत्रूडॉ. देशपांडे म्हणाले, लैंगिक आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर ते वय आहे. परंतु वयाच्या ४५नंतर पती-पत्नीमधील लैंगिकविषयक न्यूनगंड दूर केल्यास दोघांच्या आरोग्यासाठी हिताचे ठरते. वयासोबतच लठ्ठपणा, अयोग्य जीवनशैली, धूम्रपान, १० ते १४ टक्के मधुमेह, शहरात २९ टक्के तर ग्रामीणमध्ये २७ टक्के उच्च रक्तदाब, हृदय रक्तवाहिन्यांच्या विकार, अमली पदार्थ व चुकीचे संबंध हेही शत्रू आहेत.४५नंतरही ६९ टक्के लोक लैंगिक जीवन जगत आहेत‘अमेरिकन नॅशनल कौन्सिल ऑन एजिंग फाऊंड’ यांनी केलेल्या एका अभ्यासातून हे समोर आले, ४५ ते ५९ वयोगटातील ६० टक्के लोक आपले लैंगिक जीवन जगतात. यामुळे लैंगिक जीवनाबद्दल उदासीनता बाळगू नये. यातच ‘अनअट्रॅक्टिव्ह’ राहिल्यास लैंगिक जीवन लोप पावण्याची शक्यता असते. यामुळे या वयातही ‘अट्रॅक्टिव्ह’ राहा. एकमेकांचा आदर करा, असा सल्लाही डॉ. देशपांडे यांनी दिला.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनdoctorडॉक्टर