शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरवर अंधविश्वास ठेवू नका; ‘रेरा’तील तरतुदींवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 10:52 IST

बिल्डर व डेव्हलपर्सनी दिलेल्या माहितीवर अंधविश्वास ठेवून स्थावर संपदेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नका असे आवाहन स्थावर संपदा व्यवहारातील कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. संदीप शास्त्री यांनी केले.

ठळक मुद्देसंदीप शास्त्री यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिल्डर व डेव्हलपर्सनी दिलेल्या माहितीवर अंधविश्वास ठेवून स्थावर संपदेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नका. संबंधित माहितीच्या सत्यतेची महारेराच्या संकेतस्थळावर जाऊन पडताळणी करून घ्या. त्यानंतरच पुढचे पाऊल टाका, असे आवाहन स्थावर संपदा व्यवहारातील कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. संदीप शास्त्री यांनी केले.नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटना व अधिवक्ता परिषद नागपूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी स्थावर संपदा (विनियम व विकास) कायदा-२०१६ (रेरा)वर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते वक्ता म्हणून बोलत होते. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणच्या विदर्भ विभागाचे उपसचिव गिरीश जोशी हे दुसरे वक्ता होते. हा कार्यक्रम जिल्हा न्यायालयातील सभागृहात पार पडला.बिल्डर व डेव्हलपर्सकडून ग्राहकांची फसवणूक होणे ही नित्याचीच बाब झाली होती. फसवणूक झालेला ग्राहक त्याच्या आयुष्यभराची कमाई गमवत होता. त्यामुळे बिल्डर व डेव्हलपर्सच्या गैरव्यवहारांवर वचक निर्माण करण्यासाठी कठोर कायदा आणण्याची मागणी होती. शेवटी केंद्र सरकारने हा विषय गंभीरतेने घेऊन २०१६ मध्ये स्थावर संपदा (विनियम व विकास) कायदा आणला. राज्य सरकारने त्या अंतर्गत महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणची स्थापना केली. ५०० चौरस मीटर भूखंड आणि ८ पेक्षा जास्त सदनिकांच्या प्रकल्पांची प्राधिकरणकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.प्राधिकरण सर्व कागदपत्रे कायद्यानुसार असल्यावरच प्रकल्पांना नोंदणी प्रदान करते. तसेच, प्रकल्पाची सर्व कागदपत्रे प्राधिकरणच्या संकेतस्थळावर अपलोड केली जातात. त्यामुळे ती सर्वांना पाहता येतात. नोंदणीकृत प्रकल्पांमधील सोईसुविधा किंवा अन्य कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही तर, ग्राहक प्राधिकरणकडे तक्रार करून न्याय मागू शकतात असे शास्त्री यांनी पुढे बोलताना सांगितले. जोशी यांनीही विविध मुद्यांवर प्रकाश टाकला.प्राधिकरणकडे नोंदणी केल्याशिवाय कोणताही बिल्डर व डेव्हलपर त्यांच्या स्थावर संपदा प्रकल्पाची किंवा प्रकल्पाच्या भागाची जाहिरात व विक्री करू शकत नाही. या नियमाचे उल्लंघन केल्यास बिल्डर व डेव्हलपरला दंड किंवा कारावास किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमात प्रामुख्याने नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे, अधिवक्ता परिषदेच्या नागपूर महानगर अध्यक्षा पल्लवी खरे, सचिव दीपक गादेवार उपस्थित होते. संपदा गोडबोले यांनी संचालन केले.

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017