शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

‘विद्वत’जनांना नियम माहीत नाहीत काय?

By admin | Updated: July 3, 2014 00:47 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘विद्वत’जनांचा सहभाग असतानादेखील गोंधळाची मालिका थांबण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. प्रवेशबंदीच्या यादीतील नियमबाह्य पद्धतीने प्रविष्ट

विशेष परीक्षा : परीक्षा मंडळाचा प्रारूप तयार करण्यास नकारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘विद्वत’जनांचा सहभाग असतानादेखील गोंधळाची मालिका थांबण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. प्रवेशबंदीच्या यादीतील नियमबाह्य पद्धतीने प्रविष्ट विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासंदर्भात परीक्षा मंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु संबंधित मुद्यावर प्रारूप तयार करण्याचे परीक्षा मंडळाला अधिकारच नाही, अशी भूमिका सदस्यांनी घेतल्यामुळे या मुद्याला अजेंड्यावरून हटवावे लागले. ११ जून रोजी राज्य शासनाने प्रवेशबंदीच्या यादीतील महाविद्यालयांमधील प्रविष्ट विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते.यानंतर २६ जून रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत संस्थाचालकांच्या दबावामुळे ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांची परीक्षा कशी आणि कधी आयोजित करण्यात यावी, यासंदर्भात नियम ठरविण्यासाठी तसेच प्रारूप तयार करण्यासाठी संबंधित प्रस्ताव परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आला. मंगळवारी बैठक सुरू होताच संबंधित मुद्यावर प्रारूप तयार करण्यास नकार दिला. महाराष्ट्र विद्यापीठ नियमांत याची तरतूदच नसल्याने या मुद्याला बैठकीच्या अजेंड्यातून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जर विद्यापीठातील ‘विद्वत’ अधिकाऱ्यांना या नियमांची माहिती होती तर अजेंड्यामध्ये विशेष परीक्षेचा मुद्दा का सहभागी करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)