शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी गरीब रुग्णांना प्रतिक्षेत ठेवू नका; नितीन गडकरींनी दिल्या ‘एम्स’च्या अधिकाऱ्यांना सूचना

By सुमेध वाघमार | Updated: August 3, 2024 18:05 IST

Nagpur : गडकरी यांनी ‘एम्स’मधील कामाचा व यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा घेतला आढावा

सुमेध वाघमारे नागपूर : विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून नागपूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारण्यात आली आहे. त्यामुळे कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी प्रतिक्षेत राहणार नाही, याची काळजी घ्या, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी ‘एम्स’च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सचूना दिल्या. 

गडकरी यांनी ‘एम्स’मधील कामाचा व यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यावेळी ‘एम्स’चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संचालक डॉ. प्रशांत जोशी व इतर वरीष्ठ डॉक्टर उपस्थित होते. ‘एम्स’मध्ये गरीब रुग्णांवरील उपचाराला घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.  

उपचारांसाठी, शस्त्रक्रियांसाठी प्रतिक्षा का?‘एम्स’मध्ये उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी प्रतिक्षा का?, असा प्रश्न गडकरी यांनी विचारला. त्याचे कारण काय आहे, त्याचा शोध घ्या, असे म्हणण्याची वेळही त्यांच्यावर आली.

तर नागपुरातील ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा घ्या!उपचारासाठी गरीब रुग्णांना वाट बघायची गरज पडत असल्यास नागपुरातील ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा घेता येईल का, हे तपासून बघा. ‘एम्स’मधील परिचारिकांची रिक्त पदे भरून कामाचा ताण कमी करा, असेही त्यांनी सूचविले. 

गरिबांना लाभ होईल या दृष्टीने काम करामुबलक औषध साठा आहे की नाही, तपासण्या करणारी यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, याचीही पूर्ण काळजी घ्या. एम्समधील पूर्ण व्यवस्थेचा लाभ गरिबांना होईल यादृष्टीने काम करावे, असेही गडकरी म्हणाले. यावेळी गडकरी यांच्या हस्ते ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट युनिट’, ‘सिकल सेल युनिट’, ‘न्युक्लियर मेडिसिन’ आणि ‘आय बँक’ या विभागांचे उद्घाटन झाले.

सिकलसेलच्या रुग्णांवर उपचार झालेच पाहिजेतभंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सिकलसेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे. थॅलेसेमियाचेही रुग्ण आहेत. त्यामुळे एम्समध्ये त्यांच्यावर उपचार झालेच पाहिजे, असा आग्रह गडकरी यांनी व्यक्त केला. ‘बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट’ची संख्या वाढविण्याचा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAIIMS hospitalएम्स रुग्णालयnagpurनागपूर