शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या नावाने जनतेला वेठीस धरू नका :शिवसेना सदस्यांचे जि.प.अध्यक्षांना प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:57 IST

रामटेक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जसा रंगात येत आहे, तसतसा जि.प.च्या भाजप-सेनेच्या लोकप्रतिनिधीचा कलगीतुरा आणखी रंगताना दिसतो आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या गोडबोलेवर काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर गोडबोले यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, युतीच्या नावावर जनतेस वेठीस धरू नका. कमिशनखोरीचे पुरावे हवे असतील तर नार्को टेस्ट करा. त्यांनी अध्यक्षाच्या पतीला ‘चौकीदार’ म्हणून टोला लगावला आहे.

ठळक मुद्देकमिशनखोरीबाबतचे पुरावे पाहिजे असतील तर नार्को टेस्ट करा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रामटेक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जसा रंगात येत आहे, तसतसा जि.प.च्या भाजप-सेनेच्या लोकप्रतिनिधीचा कलगीतुरा आणखी रंगताना दिसतो आहे. अध्यक्षांनी शिवसेनेच्या गोडबोलेवर काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर गोडबोले यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, युतीच्या नावावर जनतेस वेठीस धरू नका. कमिशनखोरीचे पुरावे हवे असतील तर नार्को टेस्ट करा. त्यांनी अध्यक्षाच्या पतीला ‘चौकीदार’ म्हणून टोला लगावला आहे.गोडबोले म्हणाल्या की, गेल्या वर्षी १०७० बोअरवेल मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी ८१८ बोअरवेल झाल्या, २५२ बोअरवेल होऊ शकल्या नाही. कारण जि.प. अध्यक्ष व त्यांच्या पतीवर कमिशनखोरी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तीन वर्षांपूर्वी झालेल्या बोअरवेलच्या कामासंबंधी अध्यक्षांनी तक्रार केली व कंत्राटदाराचे २८ टक्के बिल थांबवून ठेवले. आजपर्यंत त्या प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय झाला नाही. दोन कोटीचे बिल गेल्या तीन वर्षापासून थकीत असेल तर कोण कंत्राटदार निविदा भरेल, असा सावलही त्यांनी केला. बोअरवेल कंत्राटदारांनी वारंवार इशारा दिल्यानंतरही अध्यक्षांनी काहीच उपाययोजना केल्या नाही. पाणीटंचाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर जि.प.ला सहाव्यांदा निविदा कॉल कराव्या लागत असतील तर अध्यक्षांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसची सुपारी कुणी घेतली?गोडबोले या काँग्रेसची सुपारी घेतल्यासारख्या वागतात, असा आरोप अध्यक्षांनी केला, त्यावर उत्तर देताना गोडबोले म्हणाल्या की भाजप-शिवसेनेचे अनेक सदस्य जि.प. अध्यक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. काँग्रेस सदस्यांच्या मर्जीनुसार महिला मेळावे रद्द केले जातात. काँग्रेस सदस्यांच्या मतावर जि.प. चालत असती तर काँग्रेसची सुपारी कुणी घेतली आहे. हे कोराडीच्या आई जगदंबेच्या साक्षीने अध्यक्षांनीच सांगावे, असा सवाल गोडबोले यांनी उपस्थित केला. युती धर्म पाळण्याचा सल्ला देऊ नयेयुती धर्म पाळण्याचा सल्ला अध्यक्षांनी आम्हाला देऊ नये, आम्ही युतीचे शिलेदार आहोतच. युतीचा धर्म आम्ही पाळतच आहोत. ते तुमच्याकडून शिकायची गरज नाही. शिवसेना-भाजप युती म्हणजे नागपूर जि.प.मधील पाप लपविण्यासाठी झालेली नाही. युतीच्या नावाने नागपूर जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरू नये. जिल्ह्यातील जनतेची मूलभूत गरज असलेला पाणीप्रश्न अध्यक्ष सोडवू शकत नसतील तर त्यांनी आपली खुर्ची रिकामी करावी, अशी मागणी पुन्हा जि.प. सदस्या भारतीताई देवेंद्र गोडबोले यांनी केली.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरPoliticsराजकारण