शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका  :  विजय कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:08 IST

युवक बँकेकडे ऋण घेण्यासाठी अर्ज करताना अनुदान किती मिळेल, कुठल्या गोष्टींसाठी ऋण मिळेल, तसेच कर्ज थकलं तर ते कसे वसूल कराल, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा कर्ज थकवेल, अशी एक मानसिकताच बँक व्यवस्थापकांच्या मनात तयार होते. तेव्हा अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका, आपले ध्येय निश्चित करा, काय करायचे आहे, त्याचा अभ्यास करा, असे मत महाराष्ट्र बँकेचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयुथ एम्पॉवरमेंट समिट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युवक बँकेकडे ऋण घेण्यासाठी अर्ज करताना अनुदान किती मिळेल, कुठल्या गोष्टींसाठी ऋण मिळेल, तसेच कर्ज थकलं तर ते कसे वसूल कराल, असे प्रश्न विचारतात. त्यामुळे हा कर्ज थकवेल, अशी एक मानसिकताच बँक व्यवस्थापकांच्या मनात तयार होते. तेव्हा अनुदान व सबसिडीच्या मागे लागू नका, आपले ध्येय निश्चित करा, काय करायचे आहे, त्याचा अभ्यास करा, असे मत महाराष्ट्र बँकेचे उपमहाव्यवस्थापक विजय कांबळे यांनी व्यक्त केले. तसेच बँकांमध्ये वाईट अनुभव आले तरी थांबू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.फॉर्च्युन फाऊंडेशनद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगरपालिका, इंजिनियरिंग कॉलेज प्लेसमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सुरू असलेल्या युथ एम्पॉवरमेंटमध्ये शुक्रवारी मार्गदर्शनपर सत्रामध्ये मुद्र्रा बँकिंग संदर्भातील माहिती देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. प्रा. अनिल सोले, ईसीपीएचे सचिव कुणाल पडोळे, नवनीतसिंह तुली, आशिष वांदिले उपस्थित होते.ऋण मागताना काय अभ्यास करावा याची माहिती देताना विजय कांबळे पुढे म्हणाले की, अनुदान मिळते म्हणून व्यवसाय करू नका, व्यवसायासंबंधीची माहिती कादगावर उतरवून त्याचे सर्वसाधारण अंदाजपत्र तयार करावे. हे सांगताना त्यांनी सीएची आवश्यकता नसल्याचेही विशेषत्वाने सांगितले.आपल्यातील आत्मविश्वास बँकेच्या व्यवस्थापकांची मानसिकता बदलवून त्यांना ऋण देण्यास भाग पाडेल, असा विश्वासही व्यक्त केला. कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळविण्याच्या दृष्टीने बँक आॅफ महाराष्ट्र आणि आपल्या कॅबिनचे दरवाजे नेहमी खुले असल्याचेही त्यांनी यावेळी विशेषत्वाने नमूद केले.फ्लाय अ‍ॅशच्या व्यवसायातून रोजगाराच्या संधी - सुधीर पालीवालवीज प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅश (राखड) निर्माण होते. ती मानवाच्या स्वास्थ्यासाठी हानीकारक असते. मात्र, त्याद्वारे बांधकामाच्या संबंधित वस्तूंची निर्मिती होऊ शकते. त्याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन प्रदूषणालाही आळा बसेल, असे मत महाराष्ट्र स्टेट फ्लाय अ‍ॅश कौन्सिलचे तज्ज्ञ सदस्य सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केले. फ्लाय अ‍ॅशच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबद्दल त्यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले.

टॅग्स :nagpurनागपूर