शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका.. तुकाराम मुंढे यांनी दिला धोक्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 14:57 IST

नागरिकांनी अत्यंत जागरुकपणे वागण्याची गरज असल्याचे कळकळीचे निवेदन व कोरोनाबाबत निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात केले आहे.

ठळक मुद्देऑगस्टमध्ये कोरोना ब्लास्ट चिंताजनक१७ हजारांहून अधिक केसेस व ५०० हून अधिक मृत्यूया परिस्थितीला जबाबदार कोण हा प्रश्न स्वत:ला विचारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात झालेला कोरोनाचा ब्लास्ट ही चिंता करण्याची स्थिती असून, नागरिकांनी अत्यंत जागरुकपणे वागण्याची गरज असल्याचे कळकळीचे निवेदन व कोरोनाबाबत निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात केले आहे.जुलै अखेर व ऑगस्ट महिन्यात नागपुरात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण एकाएकी वाढले व मृत्यूदरही वाढता असण्यामागे काय कारणे आहेत व त्याचा प्रतिरोध कसा करावा याबाबत त्यांनी आकडेवारीसह माहिती दिली.सध्या नागपुरात १७ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत व ५०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.यामागे अनेक कारणे आहेत. यात नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याचे आढळून आले आहे. मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न राखणे, गर्दी करणे, दवाखान्यात उशीरा जाणे, आजारपण लपवणे, खोकताना वा शिंकताना काळजी न घेणे अशी अनेक कारणे त्यांनी सांगितली.प्रशासन वा सरकार काही करत नाही, असं नागरिक म्हणतात. मात्र नागरिक काय करत आहेत हे ते पाहत नाहीत. सणावारांचे दिवस आहेत. नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यांनी बाहेर पडताना काळजी घेतली पाहिजे. घरातून निघताना व घरी परतल्यावर सर्व काळजीचे नियम पाळले पाहिजेत.नागरिक बाहेर पडताना मास्क घालत नाहीत. समोर पोलीस दिसला की थोडा वेळ मास्क लावतात. नंतर काढून टाकतात. तसे करून ते स्वत:चा जीव तर धोक्यात घालताच पण इतरांचाही घालत असतात.नागपुरात कोरोना वाढतोय यामागे काय कारणे आहेत, हा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची गरज आहे.मार्च एप्रिलमध्ये नागपुरात तंबाखू, खर्रा खाण्याचे प्रमाण झपाटयाने कमी झाले होते. मात्र जुलै ऑगस्टमध्ये हे प्रमाण पुन्हा पूर्ववत झाल्याचे आढळून आले आहे. हीदेखील एक मोठी चिंतेची गोष्ट आहे. या सोशल निवेदनात त्यांनी अनेक लहानसहान गोष्टींपासून ते मोठ्या बाबींपर्यंतच्या घटकांचा सविस्तर आढावा घेतला.जुन्या व्हिडिओला हेतूपुरस्सरपणे दाखवले जात आहेमार्चमहिन्यात शासनाच्या निर्देशानुसार फक्त डॉक्टर व रुग्णांनी मास्क घालणे अनिवार्य होते. त्यावेळी मी काढलेला व्हिडिओ आता दाखवला जातो आहे. मात्र नंतर सरकारने बदलेल्या निर्देशानुसार आम्ही मास्क घालणे अनिवार्य केला आहे. त्याबाबत सतत माहिती देत आहोत व आवाहन करत आहोत. अशा काळात जुना व्हिडिओ दाखवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांनी तसे करू नये. हा खोडसाळपणा बंद करावा.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस