शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

हिवाळी अधिवेशन काळात शहरात खोदकाम करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:58 IST

Nagpur : कंत्राटदार व विकासकांना महावितरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आणि अधिवेशनादरम्यान कुठल्याही यंत्रणेने किंवा नागरिकांनी शहरात खोदकाम करु नये, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत काही खोदकाम करणे आवश्यक असल्यास अशा खोदकामाची महावितरणला पूर्वसूचना दिल्यास होणारे नुकसान टळून ग्राहकांनाही त्रास होणार नाही, असे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने युद्धस्तरावर तयारी ठेवली असून, यासाठी शहरातील सर्व विकास यंत्रणांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नागपूर शहरात मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पाणीपुरवठा, महानगरपालिका, दूरसंचार विभाग, खासगी इंटरनेट आणि केबल टीव्ही कंपन्या यासारख्या अनेक विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असून, त्यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठ्या ड्रील मशीन्सच्या सहाय्याने खोदकामही करण्यात येत आहे. 

व्हीव्हीआयपी परिसरात वीज कर्मचारी २४ तास तैनात हिवाळी अधिवेशन काळात व्हीव्हीआयपी परिसरात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणकडून येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एका लाइनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱ्या लाइनमधून वीजपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरळीत राखण्यासोबतच कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. विधिमंडळ, झीरो माईल्स, राजभवन, रामगिरी, देवगिरी, रविभवन, नाग भवन, आमदार निवास, न्यू हैदराबाद हाऊस, मुख्यमंत्री सचिवालय आणि १६० खोल्यांचे गाळे या व्हीव्हीआयपी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज यंत्रणा आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. वीजपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी घेतला आढावा विधिमंडळ, राजभवन, रविभवन, नागभवन आणि इतरही भागात अधिवेशन काळात तेथील वीज वितरण यंत्रणा सुरळीत ठेवण्याबाबत महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि कार्यकारी अभियंते हेमराज ढोके आणि राजेश घाटोळे, शंकरनगर, धंतोली, सिव्हिल लाईन्स, एमआरएस या भागातील महावितरण अभियंते यांनी विधानभवन परिसर आणि इतर संबंधित उपकेंद्रांना भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेत सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर