शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस खात्याला बदनाम करू नका ; नागपूर पोलीस आयुक्तांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:04 IST

आपल्या कृत्यामुळे पोलीस विभागाचे नाव बदनाम करू नका, अन्यथा असे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सकाळी साप्ताहिक गुन्हे बैठकीत दिली.

ठळक मुद्देबैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची केली कानउघाडणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : आपल्या कृत्यामुळे पोलीस विभागाचे नाव बदनाम करू नका, अन्यथा असे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सकाळी साप्ताहिक गुन्हे बैठकीत दिली.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सकाळी साप्ताहिक गुन्हे बैठकीत गिट्टीखदान ठाण्यातील संदल प्रकरणावर चर्चा करताना उपस्थित ठाणेदारांची कानउघाडणी केली. २१ नोव्हेंबरला रात्री युवराज नावाच्या कर्मचाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त गिट्टीखदान ठाण्यात संदल वाजविण्यात आला होता. ठाण्याच्या आत झालेल्या डान्स पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. २१ नोव्हेंबरला सकाळी लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकरचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. यावेळी गिट्टीखदान ठाण्यात उत्सव सुरू होता. यावेळी अधिकारी, कर्मचारी सावनेर, मध्य प्रदेशाच्या सीमेवर राहुल आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. हे प्रकरण प्रसार माध्यमात आल्यामुळे अधिकाऱ्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना सांगितले की, गिट्टीखदानसारख्या घटनांमुळे पोलीस विभागाचे नाव खराब होते. या प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. वाढदिवस साजरा करायचा असेल तर सुटी घेऊन साजरा करा. ठाण्यात उत्सव साजरा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात संदल वाजविण्याची माहिती गिट्टीखदानच्या ठाणेदारालाही नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो दुसरीकडचा असल्याचे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे पोलीस आयुक्त नाराज होते. या प्रकाराची पुनरावृत्ती थांबविण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी ठाणेदारांना दिल्या. मागील काही दिवसातील खून आणि घटना तसेच हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताबाबत त्यांनी ठाणेदारांशी चर्चा केली.ठाणेदारांना मनुष्यबळाची चिंताहिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षी बाहेरून कमी संख्येने अधिकारी, कर्मचारी बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातील बहुतांश पोलिसांचा बंदोबस्तात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे ठाणेदार चिंतेत आहेत. त्यांच्या मते अधिवेशनादरम्यान अचानक एखादी समस्या निर्माण झाल्यास त्यांच्या नाकीनऊ येणार आहेत.

 

टॅग्स :Policeपोलिस