शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही पराभवानं खचून जाऊ नका; राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:05 IST

वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना नवनियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले

नागपूर : एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज तो भाजपचा बालेकिल्ला झालाय. प्रत्येक राजकीय पक्ष यातून गेला आहे. काही काळानंतर सत्तांतर होत असतात, पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. मनसेच्याही वाट्याला यश आलं, अपयश आलं. पण आपण खचलो नाही आणि खचणारही नाही. असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. कोणत्याही पराभवानं खचून जाऊ नका, फक्त जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहा, यश नक्कीच आपलं आहे असा सल्ला त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकदिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. आज वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात विदर्भातील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गेल्यावेळी आपण विदर्भाच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर मनसेला पदाधिकाऱ्यासाठी माणसं मिळत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्यांनी त्या बातम्या टाकल्या होत्या त्यांनी डोळ्यात अंजन घालावं. यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्रवाटप करण्यात आले असल्याचं राज ठाकरे म्हणाले. 

जे लोकं आपल्यावर हसताहेत त्यांना हसू द्या. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून हे पोट्टं काय करणार असंही काही लोक बोलत असतील तर बोलू द्यावं. पण मी विश्वास देतो की एकदिवशी हेच पोट्टं त्यांच्यावर वरवंटा फिरवणार असा इशारा त्यांनी मनसेची खिल्ली उडविणाऱ्यांना दिला. तर, तुम्हाला निवडून हे पद देण्यात आलं आहे. त्या पदाची जबाबदारी ओळखा. तुम्ही कोणत्याही पदावर असला तरी दुसऱ्या पदाधिकाऱ्याला कधी तुच्छ मानू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. 

Maharashtra Winter Session:...अन् राज ठाकरे विधानभवनात पोहचले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट

राज ठाकरे विधिमंडळात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

दरम्यान, मनसेचा पक्षीय कार्यक्रम आटोपून राज ठाकरे नागपूरच्या विधान भवनात पोहचले. राज ठाकरे विधानभवनात पोहचल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जात राज ठाकरेंनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे  नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण