शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

'नवीन मोटार वाहतूक कायदा महाराष्ट्रात लागू करू नका; कमाल दंड ५०० रुपयांच्या वर नको!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 9:59 PM

दहापट दंड आकारणे चुकीचे असून नवीन मोटार वाहतूक कायदा महाराष्ट्रात लागू करू नये. जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत दंड आकारावा, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देग्राहक पंचायतची मागणी : ५०० रुपयांपर्यंत दंड आकारावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मोटार वाहतूक कायद्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून देशात काही राज्यात करण्यात आली. या कायद्यान्वये अवाजवी दहापट दंड आकारणे चुकीचे असून नवीन कायदा महाराष्ट्रात लागू करू नये. जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत दंड आकारावा, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केली आहे.कुठलाही कायदा करताना सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासात घेतलेले नाही. नवीन कायद्यात दहापट दंडाची तरतूद केली आहे. ही शिक्षा लोकशाहीत अव्यावहारिक असून हा जिझिया कर आकारण्यासारखे आहे. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. दहापट दंड श्रीमंत लोक भरू शकतील, पण गरीब आणि सामान्य भरू शकणार नाही. त्यांनी आपली वाहने विकून दंड भरायचा का, असा सवाल ग्राहक पंचायतने उपस्थित केला आहे. या मोटारवाहनाचा गुन्हा हा काही फौजदारी गुन्ह्यासारखा दुसऱ्याला इजा करणारा किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवणारा नाही. सिटबेल्ट न लावणे आणि विना हेल्मेट मोटरसायकल चालविणाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. हेल्मेट सक्तीचे करणेच चुकीचे असून लोकशाहीच्या मूळ तत्त्वातच बसत नाही, असेही ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे.नवीन कायदा दुरुस्तीमध्ये एकच बाब समाधानाची आहे. मोटार अपघातातील पीडितांना नुकसान भरपाईबाबत मोबदला देण्यासाठी चांगला बदल कायद्यात करण्यात आला आहे. अपघातातील मृतांना किमान पाच लाख रुपये व गंभीर जखमींना किमान अडीच लाख रुपये वाहनमालक किंवा संबंधित विमा कंपनीतर्फे देणे बंधनकारक आहे. कायद्याचा हेतू मोटार अपघातावर नियंत्रण करणे असेल तर भरधाव व निष्काळजीपणाने वाहन चालविणे, यासाठीही कडक शिक्षा हवी. वाहन रस्त्यांवर उभे करणे आणि टेललॅम्प नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण फार जास्त आहे. यावर मात्र कोणत्याही कठोर शिक्षेची तरतूद नाही. चुकीच्या ओव्हरटेकमुळे अपघात होतात. यावर कठोर शिक्षा हवी. याकडे सरकारने लक्ष दिले नाही, असे पांडे यांनी सांगितले. ड्रायव्हिंग लायसन्स व वाहनाची मूळ कागदपत्रे सोबत नसणे हा गुन्हा ठरू नये. कागदपत्राची झेरॉक्स किंवा मोबाईलमध्ये कागदपत्रांचे फोटो स्वीकृत करावे, अशी मागणी ग्राहक पंचायतचे संजय धर्माधिकारी, डॉ. नारायण मेहेरे, डॉ. अजय गाडे, गणेश शिरोळे, प्रवीण शर्मा, दत्तात्रय कठाळे, अनिरुद्ध गुप्ते, अ‍ॅड. प्रेमचंद्र मिश्रीकोटकर, अ‍ॅड. श्रीपाद कुळकर्णी यांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीMaharashtraमहाराष्ट्र