शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंत्री खोटे बोलतात का ?

By admin | Updated: April 25, 2017 01:36 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत विविध आक्षेप घेण्यात येत आहेत.

५० टक्क्यांहून अधिकची मान्यताच नाही : उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा दावानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत विविध आक्षेप घेण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत प्रशासनाने २३ जागांसाठी जाहिरात काढली. मात्र एकूण पदांच्या ५० टक्के भरतीचा नियम शिक्षण क्षेत्रासाठी लागू नाही, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला होता. मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभागानेच तावडे यांच्या दाव्याला सुरुंग लावला आहे. ५० टक्क्यांहून अधिक पदभरतीची मान्यताच नसल्याचे विभागाच्या सहसचिवांनी पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीवरील भार लक्षात घेता, वित्त विभागाने काही विभागांना अगोदर ७५ टक्के पदभरतीची सूट दिली होती. मात्र नंतर सुधारणा करून ही मर्यादा ५० टक्क्यांवर आणली होती. २ जून व १६ जुलै २०१५ रोजीच्या शासन निर्णयात तसे स्पष्टपणे नमूददेखील करण्यात आले. शिक्षकेतर प्रवर्गात सरळसेवेतील रिक्त पदाच्या ५० टक्के किंवा एकूण मंजूर पदांच्या ४ टक्के यापैकी जे कमी असतील ते भरा, असे शासन निर्देशात नमूद होते. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने २३ महत्त्वाच्या शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात काढली. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना केवळ २३ पदांसाठीच जाहिरात निघाल्याच्या संदर्भात विनोद तावडे यांना विचारणा केली असता, पदभरतीची मर्यादा शिक्षण विभागासाठी नाही, असा दावा त्यांनी केला होता. सोबतच तीन महिन्यांत १०० टक्के पदे भरण्यात येतील, असेदेखील त्यांनी म्हटले होते.मात्र २१ एप्रिल २०१७ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांच्या नावाने पत्र जारी केले. शासन निर्णयानुसार रिक्त असलेल्या पदांपैकी ५० टक्के किंवा एकूण संवर्गाच्या ४ टक्के यापैकी जे कमी असेल इतकीच पदे भरण्यास मुभा आहे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रामुळे तावडे यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी हे पत्र प्राप्त झाल्याचे सांगितले. शासन निर्णयानुसारच विद्यापीठाने जाहिरात काढल्याचा त्यांना पुनरुच्चार केला. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत विविध आक्षेप घेण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत प्रशासनाने २३ जागांसाठी जाहिरात काढली. मात्र एकूण पदांच्या ५० टक्के भरतीचा नियम शिक्षण क्षेत्रासाठी लागू नाही, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला होता. मात्र उच्च व तंत्रशिक्षण विभागानेच तावडे यांच्या दाव्याला सुरुंग लावला आहे. ५० टक्क्यांहून अधिक पदभरतीची मान्यताच नसल्याचे विभागाच्या सहसचिवांनी पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मात्र राज्याच्या तिजोरीवरील भार लक्षात घेता, वित्त विभागाने काही विभागांना अगोदर ७५ टक्के पदभरतीची सूट दिली होती. मात्र नंतर सुधारणा करून ही मर्यादा ५० टक्क्यांवर आणली होती. २ जून व १६ जुलै २०१५ रोजीच्या शासन निर्णयात तसे स्पष्टपणे नमूददेखील करण्यात आले. शिक्षकेतर प्रवर्गात सरळसेवेतील रिक्त पदाच्या ५० टक्के किंवा एकूण मंजूर पदांच्या ४ टक्के यापैकी जे कमी असतील ते भरा, असे शासन निर्देशात नमूद होते. त्यानुसार नागपूर विद्यापीठाने २३ महत्त्वाच्या शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात काढली. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना केवळ २३ पदांसाठीच जाहिरात निघाल्याच्या संदर्भात विनोद तावडे यांना विचारणा केली असता, पदभरतीची मर्यादा शिक्षण विभागासाठी नाही, असा दावा त्यांनी केला होता. सोबतच तीन महिन्यांत १०० टक्के पदे भरण्यात येतील, असेदेखील त्यांनी म्हटले होते.मात्र २१ एप्रिल २०१७ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांच्या नावाने पत्र जारी केले. शासन निर्णयानुसार रिक्त असलेल्या पदांपैकी ५० टक्के किंवा एकूण संवर्गाच्या ४ टक्के यापैकी जे कमी असेल इतकीच पदे भरण्यास मुभा आहे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रामुळे तावडे यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी हे पत्र प्राप्त झाल्याचे सांगितले. शासन निर्णयानुसारच विद्यापीठाने जाहिरात काढल्याचा त्यांना पुनरुच्चार केला. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)