शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ओळख पटविण्यासाठी आता डीएनए चाचणी; साेलर स्फाेट प्रकरण : मृतदेहांचे तुकडे विखुरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 08:19 IST

पाेलिसांनी घटनास्थळाहून चार मृतदेह, दाेन धड आणि शरीराच्या अवयवांचे १८ विविध भाग ताब्यात घेतले आहेत.  

लाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चाकडोह (ता. नागपूर ग्रामीण) शिवारातील साेलर इंडस्ट्रीजमध्ये रविवारी झालेल्या स्फाेटात नऊ कामगारांचा जीव गेला. येथील मृतदेहांची ओळख पटविणे कठीण असल्याने डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. 

पाेलिसांनी घटनास्थळाहून चार मृतदेह, दाेन धड आणि शरीराच्या अवयवांचे १८ विविध भाग ताब्यात घेतले आहेत.  मृतदेह ओळख पटण्याच्या स्थितीत नसल्याची माहिती पाेलिस अधीक्षक हर्ष पाेद्दार यांनी सोमवारी दिली. नागपूर (ग्रामीण) पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यात त्यांना ६० ते ८० टक्के शाबूत असलेले चार मृतदेह, दाेन धड व शरीराचे १८ वेगवेगळे भाग आढळले. ते सर्व शवविच्छेदन व तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. साेमवारी सकाळपासून शवविच्छेदन सुरू करण्यात आले. 

स्फाेटाच्या कारणांचा शाेध सुरू ‘क्रिमिनल लायबिलिटी’ आणि ‘सेफ्टी प्राेटाेकाॅल’ विचारात घेता या प्रकरणात सध्या भादंवि ३०४ (सदाेष मनुष्यवध) ऐवजी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणाची नागपूर ग्रामीण पाेलिस व पेट्राेलियम एक्स्पाेझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन स्वतंत्रपणे चाैकशी करत आहे. पाेलिसांच्या रिपाेर्ट आधारे जिल्हाधिकारी या प्रकरणाची स्वतंत्र चाैकशी करू शकतात.

१०० मीटर परिघात काेम्बिंगnपाेलिसांच्या दाेन टीमनी साेमवारी घटनास्थळाच्या १०० मीटर परिघात काेम्बिंग सुरू केले आहे. यात पाेलिस मृतदेहांचे काही अवयव अथवा शरीराचे भाग मिळतात का? याची चाचपणी करत आहेत. nहाडांचे नमुने घेण्यासाठी तेथील ढिगाऱ्याचे खाेदकाम सुरू केले आहे, असेही पाेलिस अधीक्षक हर्ष पाेद्दार यांनी सांगितले.

टॅग्स :Blastस्फोट