शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाद्वारे डी.लिट., डीएसस्सीला नागपूर विद्यापीठाची ना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 01:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे. यापुढे केवळ मानद उपाधीच देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यापीठातर्फे लवकरच निर्णय जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलवकरच निर्णय घेणार : केवळ मानद उपाधीच देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे. यापुढे केवळ मानद उपाधीच देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यापीठातर्फे लवकरच निर्णय जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.राज्यातील इतर मोठ्या विद्यापीठांनी संशोधनाद्वारे मिळणारी ‘डी.लिट.’ तसेच ‘डीएसस्सी’ या पदव्या बंद केल्या आहेत. नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातदेखील दोनपेक्षा अधिक मानद उपाधी देऊ नये अशी तरतूद आहे. सद्यस्थिती या दोन्ही पदव्यांसाठी विद्यापीठाकडे २५ हून अधिक प्रस्ताव आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून हे प्रस्ताव आले आहेत.‘पीएचडी’ झालेले संशोधक हे त्याच विषयामध्ये आणखी काही विशेष संशोधन करून या पदव्यांसाठी पदवीसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवितात.नवीन विद्यापीठ कायद्यानुसार संशोधनाद्वारे ‘डी.लिट’ आणि ‘डी.एसस्सी’ या पदव्या देण्यासंदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही. त्यानुसार त्याची तपासणी करून या पदव्या देण्यात येतात. मात्र विद्यापीठ कायद्यानेच याला बंधने घातल्याने नागपूर विद्यापीठ लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे यापुढे केवळ विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींनाच मानद उपाधी प्रदान करण्यात येईल, असा विद्यापीठ विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी