शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
3
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
4
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
5
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
6
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
7
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
8
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
9
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
10
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
11
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
12
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
13
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
14
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
15
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
16
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
17
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
18
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
19
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
20
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

डी.एल.एड. प्रवेश प्रक्रिया थांबणार?

By admin | Updated: June 9, 2016 02:18 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड. - डिप्लोमा इन एलिमेंट्री

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड. - डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन : पूर्वीचे डी. एड.) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भातील वादग्रस्त परिपत्रकावर स्थगिती दिली. परिणामी या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तूर्तास थांबविली जाऊ शकते.प्रवेश प्रक्रियेची जाहिरात देताना त्यामध्ये हा अभ्यासक्रम केल्यानंतर नोकरी मिळण्याची कोणतीही खात्री नाही अशी सूचना टाकण्यात यावी असे निर्देश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने २६ एप्रिल २०१६ रोजी हे परिपत्रक जारी केले आहे. या वादग्रस्त परिपत्रकाविरुद्ध सावनेर येथील श्रीकृष्ण अध्यापक विद्यालयासह एकूण ११ महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. जाहिरातीमध्ये नोकरीची खात्री नसल्याची अट प्रकाशित केल्यास विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रवेश घेणार नाही. यामुळे आधीच संकटात असलेली डी.एल.एड. महाविद्यालये बंद करावी लागतील असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर वादग्रस्त परिपत्रकावर स्थगिती देऊन शालेय शिक्षण विभागाचे सचिव, पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक यांच्यासह अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली. प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी २२ जूनपर्यंत वेळ देण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षकाची नोकरी हमखास मिळत होती. यामुळे इयत्ता बारावीनंतर डी. एड. अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल होता. परिणामी प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा होती. ८० ते ८५ टक्क्यांवर गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत होता. ही बाब लक्षात घेता राज्यात अनेकांनी डी.एड. महाविद्यालये सुरू केली. यामुळे डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकाच्या नोकऱ्या कमी होत गेल्या. डी.एड. पदवीधारक विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले. यामुळे या अभ्यासक्रमाचे महत्त्व आता कमी झाले आहे. राज्यात पूर्वी १४०० डी. एड. महाविद्यालये होती. गेल्यावर्षी यापैकी ५०० महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी बंद पडली. डी.एड. महाविद्यालयांना गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांची कमतरता भासत आहे. यातच शासनाने वादग्रस्त परिपत्रक जारी केल्यामुळे महाविद्यालयांच्या संकटात भर पडली असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यावर्षी डी.एल.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रशांत शेंडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)