शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना पुणे-नागपूर सुपरफास्टची दिवाळी भेट; आजपासून धावणार विशेष एकेरी गाडी

By नरेश डोंगरे | Updated: November 4, 2023 19:11 IST

खासगी प्रवासी बसवाल्यांना चाप

नागपूर : दिवाळीच्या सणाला निघालेल्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दराने प्रवास भाडे घेऊन त्यांची आर्थिक लुट करणाऱ्या खासगी बसवाल्यांना चाप देण्यासाठी रेल्वेने पुणे नागपूर ही विशेष एकेरी रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी, ५ नोव्हेंबरपासून ही रेल्वेगाडी सुरू होणार आहे.

पुणे, मुंबई, नागपूर मार्गावर दिवाळीच्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी होते. अचानक गर्दी वाढल्याने रेल्वेत रिझर्वेशन मिळत नाही. त्यामुळे बहुतांश प्रवासी रेल्वेकडून खासगी बस (ट्रॅव्हल्स)कडे धाव घेतात. अचानक प्रवाशांची मोठी झुंबड उडाल्याचे पाहून ट्रॅव्हल्सचे संचालक गैरफायदा उचलतात. सोळाशे-अठराशेचे प्रवास भाडे साडेतीन चार हजार आणि त्याहीपेक्षा जास्त करतात. प्रवाशांकडे पर्याय नसल्याचे हेरून ट्रॅव्हल्सवाले त्यांची आर्थिक लूट करतात.

दुसरीकडे साधन उपलब्ध नसल्याने अनिच्छेने का होईना मात्र प्रवाशी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे जास्तीची रक्कम मोजून प्रवास करतात. खास करून दरवर्षी पुणे - नागपूर मार्गावर दिवाळीच्या आठ दिवसांपूर्वीपासून तो दिवाळीच्या पुढच्या दोन आठवड्यांपर्यंत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. ते लक्षात घेत मध्य रेल्वेने ०२१०७ क्रमांकाची विशेष ट्रेन पुणे - नागपूर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी, ५ नोव्हेंबर पासून ती धावणार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता ही रेल्वेगाडी पुण्यातून सुटेल आणि सोमवारी सकाळी ६.५० वाजता नागपूरला पोहचेल.२४ डबे अन् १३ जागी थांबे 

२४ डब्यांच्या या गाडीत १३ शयनयान, दोन एसी -१, तीन एसी-२ आणि जनरल ६ तसेच दोन एसएलआर कोच राहणार आहे. पुण्यानंतर नागपूरपर्यंत उरुळी, दाैंड कॉर्ड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावल, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर