दिवाळीचा फराळ महागला, महागाईत खिशाला बसणार कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 05:59 PM2021-10-23T17:59:40+5:302021-10-23T18:00:58+5:30

Nagpur News तेल, तूप, डाळी आणि स्वयंपाकघरातील अन्य कच्च्या पदार्थांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्केने वधारले आहेत. त्यामुळे, साहजिकच दिवाळीमध्ये घरोघरी तयार होणारा फराळही महागला आहे.

Diwali Faral is expensive, scissors will fit in the pocket of inflation | दिवाळीचा फराळ महागला, महागाईत खिशाला बसणार कात्री

दिवाळीचा फराळ महागला, महागाईत खिशाला बसणार कात्री

Next
ठळक मुद्देप्रति किलोमागे दर २५ टक्केने वाढलेघरच्या फराळावरही महागाईचा भार

नागपूर : कोरोना संक्रमण आणि इंधनाचे सतत वाढत असलेले दर, या सगळ्याचा फटका खाद्यसामग्रीवर प्रचंड बसला आहे. तेल, तूप, डाळी आणि स्वयंपाकघरातील अन्य कच्च्या पदार्थांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्केने वधारले आहेत. त्यामुळे, साहजिकच दिवाळीमध्ये घरोघरी तयार होणारा फराळही महागला आहे. विक्रेत्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत फराळातील प्रत्येक मेन्यूमध्ये प्रति किलो २५ टक्के दरवाढ केलेली आहे.

दिवाळी फराळ - आताचे दर (प्रति किलो) - आधीचे दर (प्रति किलो)

चकली - ४८० रु. - २५० रु.

करंजी - ५५० ते ६५० रु. - २५० ते ३५० रु.

लाडू - ५०० ते ६०० रु. - ३०० ते ४०० रु.

शंकरपाळे - ३५० ते ४८० रु. - २०० ते २५० रु.

चिवडा - ४०० ते ४५० रु. - २०० ते ३०० रु.

अनारसे - ५८० रु. - ३५० ते ४०० रु.

बेसन शेव - ३०० रु. - २३० रु.

लसूण भाकरवडी - २६० रु. - २०० रु.

खारी बुंदी - २८० रु. - २०० रु.

खट्टा-मिठा फरसाण - २६० रु. - २०० रु.

मकई चिवडा - २६० रु. - २०० रु.

चिरवंट - ५८० रु. - ४०० रु.

म्हणून महागला फराळ

इंधनाचे सतत वाढत असलेले दर हे फराळ महागण्याचे प्रमुख कारण आहे. गेल्या वर्षी खाद्यतेलाचे दर प्रति १५ किलो १६००-१८०० होते. तेच दर यंदा २५०० ते ३००० रुपयेपर्यंत गेले आहेत. शिवाय, स्वयंपाकाच्या सिलिंडरचे दरही वाढले आहेत. शिवाय, कच्ची खाद्यसामग्रीही वधारली आहे. त्यामुळे, यंदा फराळ महागले आहेत.

- मोनिका रेखडे, फराळ विक्रेते

 

मागणीवर कोणताही परिणाम नाही

कोरोना संक्रमणामुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे, हंगामी व्यवसाय करणारे वाढले आहेत. बहुतांश बेरोजगारांना दिवाळीचा फराळ बनविणे सोयीचे झाले असल्याने फराळ बनविणारे व विकणारे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. महागाई वाढली असली तरी फराळ मागणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. मात्र, विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ग्राहकांची वाटणी झाली आहे.

- प्रफुल्ल माटेगावकर, फराळ विक्रेते

..............

Web Title: Diwali Faral is expensive, scissors will fit in the pocket of inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.