शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अपंग विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने गाशा गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:13 IST

विदर्भातील दिव्यांग बांधवांना आर्थिक उभारी देण्यासाठी अपंग विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय नागपुरात स्थापन करण्यात आले होते़. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच या कार्यालयाने नागपुरातून कायमचाच गाशा गुंडाळला आहे़

ठळक मुद्देसामाजिक न्यायभवनातील कार्यालयाला कुलूप

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : विदर्भातील दिव्यांग बांधवांना आर्थिक उभारी देण्यासाठी अपंग विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय नागपुरात स्थापन करण्यात आले होते़ सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत महामंडळाचे कार्यालय होते. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच या कार्यालयाने नागपुरातून कायमचाच गाशा गुंडाळला आहे़सध्या या कार्यालयाला कुलूप लागले आहे़ २०१२ पासून नागपुरात हे कार्यालय सुरू करण्यात आले होते. या कार्यालयात विभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. काही दिव्यांग कर्मचाऱ्यांची यावर नियुक्ती केली होती. राजकुमार बडोले हे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाल्यानंतर महामंडळाचे विभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी पीए म्हणून ठेवून घेतले. त्यांचे पीए असलेले गजानन वाघ हे मंत्र्यांच्या कामकाजाबरोबरच कार्यालयाचे कामकाज सांभाळायचे. या कार्यालयाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या कर्जवाटपाच्या प्रस्तावाचा स्थानिक पातळीवर निपटारा होत होता. या कार्यालयाचे क्षेत्र संपूर्ण विदर्भभर पसरले होते.परंतु, सामाजिक न्यायखात्याचे मंत्री बडोले यांची उचलबांगडी झाल्यानंतर सुरेश खाडे यांनी या खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला़ त्यानंतर प्रचंड घडामोडी झाल्या़ तडकाफडकी येथील कार्यालय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या़ तसेच या कार्यालयाचे अधिकारी वाघ यांना त्यांची मूळ पदस्थापना बुलडाणा येथे परतण्याच्या सूचना करण्यात आल्या़ परंतु, अद्यापही हे कार्यालय का बंद करण्यात आले, याचे स्पष्ट उत्तर सामाजिक न्याय विभागाच्या कुठल्याही बड्या अधिकाऱ्यांकडे नाही़ अंतर्गत राजकारण काहीही असले तरी या कार्यालयामार्फत बेरोजगार दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगाराची संधी मिळत होती. काहींचे अर्ज अर्थसाहाय्य प्रस्तावित होते़ यापूर्वीच शासनाने महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना बंद केल्या आहेत़ ज्या सुरू आहेत, त्यातून कसातरी लाभ दिव्यांग बांधवांना मिळायचा़ आता या कार्यालयाअभावी तो लाभही मिळणे दुरापास्त झाले आहे़

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर