शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?
2
मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार 'सुपर कूल'; मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार
3
राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे
4
ठाण्यातील उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या ! पुण्यानंतर ठाण्यातही ‘माथाडीं’च्या नावाखाली छळवणूक
5
Mehul Choksi: स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ठोकल्या बेड्या
6
मुंबई-गोवा हायवे जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
7
Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्रातील ‘हिल’ स्टेशन्सची वाटचाल ‘हीट’ स्टेशन्सकडे
8
Mumbai: खासगी टँकर, विहिरी आणि कूपनलिकांना मुंबई महापालिकेचा दिलासा
9
Mumbai Temperature: महामुंबई दिवसेंदिवस होतेय ‘ताप’दायक; पारा पोचला ४० अंशांपार
10
"आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान
11
बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!
12
“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले
13
'मॅन ऑफ द मॅच' ठरल्यावर धोनीही सरप्राइज! नवा इतिहास रचला अन् कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी
14
"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा
15
IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!
16
दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय
17
ग्लोव्ह्ज न काढता MS धोनीचा नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो; माजी क्रिकेटर म्हणाले, हा 'तुक्का'च
18
बॉम्बने उडवून टाकेन! सलमानला धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी शोधून काढलं; समोर आली मोठी माहिती
19
"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 
20
“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका

विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक, बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचे प्रकरण

By मंगेश व्यवहारे | Updated: April 12, 2025 05:42 IST

Ulhas Narad Arrest News: बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली.

- मंगेश व्यवहारे नागपूर -  बोगस शालार्थ आयडी प्रकरणात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित केल्यानंतर शुक्रवारी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली. त्यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी दिल्याचा आरोप आहे. त्यांना मध्यरात्री १२:३० नंतर नागपुरात आणण्यात आले.

या प्रकरणात मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके, रा. जेवताळा, ता. लाखनी, जि. भंडारा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना सरळ मुख्याध्यापक बनविण्यात आले. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने नानाजी पुडके विद्यालय जेवताळा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली. या प्रकरणांमध्ये सदर पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागातील अधिकारी, वेतन पथक अधीक्षक तसेच इतर अधिकारी यांचाही समावेश असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :nagpurनागपूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र