शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या मनुष्यबळाचेही विभाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 12:48 IST

लोहमार्ग पोलिसांचा औरंगाबाद हा स्वतंत्र घटक (एसपी कार्यालय) अस्तित्वात आला असलातरी त्यासाठी अद्याप नव्याने मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपूर घटकातील मनुष्यबळाचे विभाजन करून तूर्त औरंगाबादचे कामकाज चालविले जाणार आहे.

ठळक मुद्देनवे औरंगाबाद घटक ६७६ अधिकारी-कर्मचारी४६ लिपिकवर्गीय यंत्रणेचा समावेश

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहमार्ग पोलिसांचा औरंगाबाद हा स्वतंत्र घटक (एसपी कार्यालय) अस्तित्वात आला असलातरी त्यासाठी अद्याप नव्याने मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपूर घटकातील मनुष्यबळाचे विभाजन करून तूर्त औरंगाबादचे कामकाज चालविले जाणार आहे.लोहमार्ग पोलिसांचे पुण्यात आयुक्तालय आहे. तर नागपूरला घटक प्रमुख (एसपी) कार्यालय आहे. आता त्यात औरंगाबाद या नव्या एसपी कार्यालयाची भर पडली आहे. १० मे २०१८ रोजी या संबंधीचा आदेश जारी केला गेला. त्यासाठी नव्याने यंत्रणा, साधन सामुग्री उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात नागपूर पोलीस लोहमार्ग घटकातील यंत्रणेचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात ६७६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे औरंगाबाद घटकात वर्ग करण्यात आली. त्यामध्ये उपअधीक्षक तीन, निरीक्षक आठ, सहायक निरीक्षक १९, उपनिरीक्षक २६, सहायक फौजदार ६७, जमादार १६५, पोलीस नाईक १०७ तर २८१ पोलीस शिपायांचा समावेश आहे. याशिवाय लेखाधिकारी, लिपिक, चपराशी, स्वयंपाकी, मोची, टेलर, सफाई कामगार, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता, ड्रेसर, वॉर्डबॉय यांची ४६ पदे वर्ग करण्यास मंजुरी मिळाली आहे. औरंगाबादला मुख्यालय थाटल्यानंतर ही ४६ पदे प्रत्यक्ष वर्ग केली जाणार आहे.

औरंगाबादकडे दहा पोलीस ठाणेराज्यात लोहमार्ग पोलिसांचे सहा उपअधीक्षक कार्यालय व २२ पोलीस ठाणे आहेत. त्यापैकी शेगाव, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नंदूरबार, नाशिक रोड, इगतपुरी, औरंगाबाद, नांदेड, परळी वैजनाथ हे दहा पोलीस ठाणे औरंगाबाद घटकाकडे वर्ग केले गेले आहे. त्यातील सात मनमाड उपविभागात तर तीन जालना उपविभागात समाविष्ठ करण्यात आले.

अकोला उपविभागाकडे तीन ठाणेनागपूर उपविभागात सहा पोलीस ठाणे होते. त्यापैकी अकोला, वर्धा व बडनेरा हे तीन पोलीस ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या नवनिर्मित अकोला उपविभागाकडे वर्ग केले गेले आहे. पुणे घटकातील सहा पोलीस ठाणे हे पुणे व सोलापूर उपविभागांतर्गत राहणार आहे. आतापर्यंत लोहमार्ग पोलिसात नागपूर हे १६ पोलीस ठाण्यांसह सर्वात मोठे घटक होते. परंतु आता त्यांच्याकडे केवळ सहा ठाणे ठेवण्यात आली असून दहा पोलीस ठाणे औरंगाबादला वर्ग केली गेली.

एसपी कार्यालय आयुक्तालयातऔरंगाबाद घटकाकरिता स्वतंत्र मुख्यालय, मेस, रुग्णालय अद्याप अस्तित्वात आलेले नाही. ‘पोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद’ हे कार्यालयसुद्धा तेथील पोलीस आयुक्तालयाच्या आवारात थाटण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यालयाचे मनुष्यबळ तूर्त वर्ग केले जाणार नाही.

स्वतंत्र प्रस्ताव मागितलापोलीस अधीक्षक लोहमार्ग औरंगाबाद यांच्या कार्यालयाकरिता लागणारे मनुष्यबळ, साधन सामुग्री व इतर आवश्यक बाबींबाबत रीतसर आढावा घेऊन तसा परिपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देश अपर पोलीस महासंचालक (लोहमार्ग) जयजितसिंह यांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी जारी केले.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस