शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

भाषेचे वैविध्य हाच भारताचा दागिना

By admin | Updated: June 15, 2014 00:43 IST

मी अनेक भाषातील कलाकृतीत काम केले आहे. वेगवेगळ्या भाषांतील सिनेमात काम केल्यामुळे मलाही वेगवेगळ्या परंपरा, प्रदेश, त्या भाषेचा कस आणि राहणीमान समजून घेता आले. प्रारंभीच्या काळात मी मराठीशिवाय

सोनाली कुळकर्णी : मनमोकळा संवादनागपूर : मी अनेक भाषातील कलाकृतीत काम केले आहे. वेगवेगळ्या भाषांतील सिनेमात काम केल्यामुळे मलाही वेगवेगळ्या परंपरा, प्रदेश, त्या भाषेचा कस आणि राहणीमान समजून घेता आले. प्रारंभीच्या काळात मी मराठीशिवाय इतर भाषेत काम करायला लागले तेव्हा माझ्या अनेक सहकलावंतांनी मला मूर्खात काढले. पण त्याला मी बधले नाही. काम सुरू राहिले आणि आज मला त्याचे समाधान वाटते. वेगवेगळ्या भाषेत काम केल्याने त्या भाषांतील अनेक विषयांना मला भिडता आले, समजून घेता आले. भाषेचे वैविध्य हाच तर भारताचा दागिना आहे. आपण कुठलीही भाषा नाकारली तर आपण आपल्याच भाषेला नाकारत असतो, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुळकर्णीने व्यक्त केले. ‘व्हाईट लिली आणि नाईट रायडर’ या नाटकाच्या प्रयोगासाठी ती नागपुरात आली असताना तिने पत्रकारांशी संवाद साधला. मुळात हे नाटक रसिका जोशी, मिलिंद पाठक यांचे आहे. रसिका जोशी असतानाही मी या नाटकाच्या प्रेमात होते. माझ्या काही मित्रमैत्रिणींनाही हे नाटक पाहण्याचा आग्रह मी धरला. रसिकाने यातील भूमिका जिंवत केली होती. रसिका आता नाही. त्यानंतर मिलिंदने या भूमिकेसाठी मला फोन केला आणि मी तत्काळ होकार कळविला. होकार कळवायला मी बराच वेळ घेते पण या नाटकासाठी मात्र मी तयार झाले. कारण नाटक मला माहीत होते. यात रसिकाने स्वत:ची मुद्रा अंकित केली होती. मला तिच्यासारखे जमणे शक्य नव्हते. हे नाटक रसिकाच्या आठवणींतील असले तरी मला स्वतंत्रपणे या नाटकाकडे पाहावेसे वाटले आणि तेथूनच हे नाटक माझ्यासाठी आव्हान ठरले. रसिकाचा प्रभाव बाजूला ठेवून मी ही भूमिका करते आहे. आता यात मी स्वत:लाच शोधते आहे, असे ती म्हणाली. फेसबुक, सोशल साईट्स यामुळे होणारा गोंधळ, नातेसंबंध याच बाबीवर हे नाटक आधारलेले असल्याने याचा प्रेक्षकवर्ग सर्वच वयोगटाचा आहे. ‘चैत्र’ या लघुपटाचे प्रदर्शनही १४ तारखेला पर्सिस्टंट कंपनीच्या कालिदास सभागृहात सायंकाळी ६ वाजता तिच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. यात सोनालीने भूमिका केली आहे. याप्रसंगी या लघुपटाबाबतही तिने माहिती दिली. हा लघुपट जी. ए. कुळकर्णी यांच्या कथेवर आधारलेला आहे. यावेळी कीर्ती रायकर, समीर नाफडे, विष्णू मनोहर उपस्थित होते. (प्रतिनिधी)