शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय प्रभारी मंत्री : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:54 IST

राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी मंत्री यात्रेत राहतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देनागपुरात होणार ‘रोड शो’, जिल्ह्यात सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या पाच वर्षांतील कामांचा हिशेब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून १ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या महाजनादेश यात्रेत जिल्हानिहाय मंत्र्यांकडेदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रत्येक जिल्ह्याचे प्रभारी मंत्री यात्रेत राहतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा हा प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा पोहोचल्यानंतर तेथील मंत्री मुख्यमंत्र्यांसोबत राहतील. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यासह पदाधिकारीदेखील उपस्थित राहतील. ४,३८४ किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर या यात्रेचा ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे समारोप होईल.शहांबाबत ‘सस्पेन्स’ कायममुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या उद्घाटनाला केंद्रीय नेते येण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित राहू शकतात. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता याची अंतिम माहिती प्रदेश पातळीवरून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.नागपुरात २ ऑगस्ट रोजी यात्रानागपूर शहरात २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता महाजनादेश यात्रा पोहोचेल. वर्धा मार्ग ते काटोल मार्ग यादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ असेल. चिंचभुवन, विमानतळ, सोमलवाडा, व्हेरायटी चौक, सदर, मेश्राम चौक, गिट्टीखदान, फेटरी असा हा मार्ग असेल. तर ३ ऑगस्ट रोजी रेल्वे स्थानक, मेयो इस्पितळ, गांधी पुतळा, टेलिफोन एक्सचेंज चौक, पारडी चौक या मार्गाने यात्रा मौद्याकडे जाईल. यादरम्यान काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे स्वागतदेखील करण्यात येईल. नागपूर शहरात मुख्यमंत्र्यांची एकही सभा होणार नाही. नागपूर जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी काटोल, सावनेर येथे सभा होईल.असा राहणार महाजनादेश यात्रेचा मार्ग    (प्रभारी मंत्री)१ ऑगस्ट : गुरुकुंज मोझरी, तळेगाव, आर्वी, पुलगाव, वर्धा (डॉ.अनिल बोंडे)२ ऑगस्ट : पवनार, सेलू, बुटीबोरी, नागपूर, काटोल, सावनेर (चंद्रशेखर बावनकुळे)३ ऑगस्ट : नागपूर, मौदा, भंडारा, तुमसर, तिरोडा, गोंदिया (डॉ.परिणय फुके)४ ऑगस्ट : गोंदिया, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, वडसा, ब्रम्हपुरी, आरमोरी, गडचिरोली (डॉ.परिणय फुके, सुधीर मुनगंटीवार)५ ऑगस्ट : गडचिरोली, मूल, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, माढई, वडकी, राळेगाव, कळंब, यवतमाळ (सुधीर मुनगंटीवार, अशोक उईके)६ ऑगस्ट : यवतमाळ, दारव्हा, कारंजा, मूर्तिजापूर, बोरगाव, अकोला (मदन येरावार, डॉ.रणजित पाटील)ऑगस्ट : अकोला, बाळापूर, शेगाव, खामगाव, मलकापूर, जामनेर (डॉ.संजय कुटे)८ ऑगस्ट : जामनेर, भुसावळ, जळगाव (गिरीश महाजन)पाणीटंचाईबाबत ‘सोशल मीडिया’तून जनतेशी संवादसद्यस्थितीत नागपूर शहरात पाणीकपात करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, पाण्याचे संकट हे नैसर्गिक आपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत तोतलाडोहमध्ये पुरेसे पाणी येत नाही, तोपर्यंत नागपूर शहरात पाणीकपात सुरूच राहणार. जनतेला या संकटाची जाण आहे. लोक सुशिक्षित असून ते संयम बाळगत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संकटांची कारणे पटवून सांगू, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी चौराईविरोधात अवाक्षर काढले नाही. आता आंदोलन कसे काय करतात, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.आता जिल्ह्यात ‘नो इनकमिंग’नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेते भाजपात येणार का, अशी विचारणा केली असता बावनकुळे यांनी त्यास नकार दिला. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची बी टीम भाजपासमवेतच आहे. काही मोजके नेते सोडले तर कार्यकर्ते कधीच भाजपात आले आहेत. आता ‘कोटा फुल्ल’ झाला आहे. त्यामुळे उरलेल्या नेत्यांनी काँग्रेसमध्येच थांबावे, असा टोला बावनकुळे यांनी मारला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMediaमाध्यमे