शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या बैठकीला ५ आमदारांची दांडी; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?
2
बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?
3
३ बाद २६ धावा, पाकिस्तानची निघाली हवा! बाबर आजमच्या नावावर इतिहासातील 'टुकार' कामगिरी
4
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; 'फोन -पे' मुळे छडा, आरोपी जेरबंद
5
PAK vs USA Live : मुंबईच्या सौरभने पाकिस्तानची जीरवली, टेलरच्या अफलातून कॅचने रिझवानची विकेट मिळवली, Video 
6
मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत
7
३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?
8
शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...
9
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
10
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
11
मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी
12
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
13
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
14
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
15
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
16
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
17
2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 
18
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
19
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली
20
भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट

पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार; नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 2:47 PM

प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेल मुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देमहापालिकेच्या सीएनजी बसचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेल मुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. महापालिकेच्या परिवहन विभागाची डिझेलवर धावणारी बस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात या बसच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पूर्व विदर्भात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. धानाच्या तणसापासून सीएनजी निर्माण करून यावर वाहने धावतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या परिवहन विभागाच्या १५० बसेस लवकरच सीएनजीवर धावतील. तसेच महापालिकेची १५० वाहने सीएनजीवर करण्यात यावी, यातून महापालिकेची ७० कोटींची बचत होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत केल्यास महामंडळाचा तोटा कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी